अॅड. अजित देशमुख यांची मध्यस्थी
बीड, धनंजय माने – आष्टी तालुक्यात आढळलेले सात रुग्ण बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने यातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा अंत्यविधी येथील बीड येथे झाला. अन्य सहा रुग्णांना पुणे येथे उपचारासाठी जाण्याची इच्छा होती. मात्र रुग्णालयात सहाचे सहा रुग्ण ऍडमिट होते. त्यांचा कोणीही नातेवाईक रुग्णालयाच्या बाहेर नसल्यामुळे ते अडचणीत सापडले होते. दरम्यान या रुग्णाच्या नातेवाईकांनी बाहेरच्या जिल्ह्यातून अँड. अजित देशमुख यांच्याबरोबर संपर्क साधला. देशमुख यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधितांशी संपर्क साधून या रुग्णांचे मत प्रशासनापर्यंत पोहोचवले. यासंदर्भात देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या बरोबर चर्चा देखील केली .शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांच्या सोबत अँड. देशमुख यांच्या झालेल्या बैठकीनंतर डॉ. थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. आणि या रुग्णाला पुणे येथे पाठवण्याच्या मार्ग सुकर झाला. पुणे येथील रुबी हॉस्पिटल कडे हे रुग्ण शासकीय रुग्णालय बीड येथून रवाना झाले आहेत. या रुग्णाच्या नातेवाइकांनी देशमुख त्यांच्याकडे संपर्क केला होता. त्यांनी अत्यंत कृतज्ञतेने आपल्या भावना व्यक्त करून देशमुख यांचे आभार मानत हे रुग्ण बरे झाल्यानंतर आणि लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही तुमची निश्चित भेट घेऊ असे म्हंटले. देशमुख यांच्या मध्यस्थीमुळे या रुग्णांची लवकरात लवकर सुटका झाल्यामुळे देखील या सर्व रुग्णांनी, त्याच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
आता बीड जिल्हा रुग्णालयात मध्ये अॅडमिट असलेल्या दोन रुग्नांच्या उपचाराकडे दवाखान्याने पूर्ण लक्ष केंद्रित करावं. कोरोना काळात आरोग्य यंत्रणा चांगली कार्यरत आहे. मात्र थोड्या फार उणिवा असतील, तर त्या तात्काळ दूर कराव्यात. दवाखान्यात काम करणारी पूर्ण यंत्रणा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी जीव की प्राण अशी आहे. त्यामुळे या ईश्वरी शक्तीने रुग्णासाठी अहोरात्र झटावे, असे मत देशमुख यांनी थोरात यांच्याशी चर्चा करताना मत व्यक्त केले. आपल्या संपर्कातील रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावना ऐकून आपले मनही हेलावून गेले. त्यामुळे हे रुग्ण लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना आपण केली आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे. घरातच रहावे. सामाजीक अंतर ठेवावे. बाहेर फिरताना मास्क वापरावा. विनाकारण फिरणाराला पोलिसांनी चोप द्यावा, असेही देशमुख यांनी म्हंटले आहे.
जून-जुलैमध्ये कोरोनाबाधित रुग्ण ओळखणे होणार कठीण; ते कसे काय जाणून घ्या !
लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…