बी एस एन एल कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे तीन महिन्याचे वेतन तात्काळ द्या…..

कामगारांना पूर्ववत कामावर रजू करा-अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष मनसे

हिंगणघाट,प्रतिनिधी :- संपूर्ण जगात कोरोना या विषारी व्हायरस नि थैमान घातले आहे. राज्यभर चार महिन्यांपासून सतत लॉक डाऊन सुरु आहे अशातच खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्याचे व कामगारांचे वेतन पूर्णपणे मिळत नाही.
आज दि. २७ जून रोज शनिवार ला मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहर संघटक अजय पर्बत यांनी बी एस एन एल अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले.

या निवेदनात महाराष्ट्रामध्ये भारत संचार निगम लिमिटेड या टेलिकॉम क्षेत्रामध्ये युटिलिटी मेंटेनन्स च्या कामाचे टेंडर इतर कंपनीला देऊन भारत संचार निगम ली वर्धा येथे नियुक्ती केलेली मागील सुमित सर्व्हिस प्रायव्हेट ली. या कंपनीचे असंख्य कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यापासून वेतन दिले नाही. पगारा पासून वंचित ठेऊन नौकरी पासूनही वंचित ठेवण्यात आले. आणि तेवढ्या वेळात बी एस एन एल कंपनीने दुसऱ्या कंपनीला काम देऊ केले मागील कंत्राटी कामगारांवर दुर्लक्ष करून त्यांना कामावर न घेता कामापासून वंचित ठेवले अशा कामगारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील अशा शब्दात बी एस एन एल कंपनीच्या अधिकाऱ्याला अजय पर्बत यांनी खडसावले.

प्रतिक्रिया :- सध्या राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे चार महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहेत आधीच कामगाराची परिस्थिती गंभीर आहे त्यांचा परिवार त्यांच्यावर अवलंबून आहे जीवनावशक्य वस्तू, किराणा, धान्य, औषधी, इलेक्ट्रिक बिल, मुलांच्या शाळेची फी, त्यांचा खर्च यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यातही त्या संपूर्ण कंत्राटी कामगारांचे तीन महिन्याचे वेतन तर थांबवले परंतु कामगारांवर दुर्लक्ष करून त्यांना कामावर न घेता कामापासून वंचित ठेवण्यात आले असा अन्याय जर मराठी माणसावर मराठी कामगारांवर होत असतील तर तो अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही भविष्यात याचे अतिप्रमाणात पडसाद उमटायला वेळ लागणार नाही…….अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा

‘टिकटॉक’ला दिली ‘या’ भारतीय अ‍ॅपने टक्कर; प्ले स्टोअरवर गाठला 1 कोटींचा टप्पा

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

wardha
Comments (0)
Add Comment