भरत नवगिरे ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोनिवली येथे स्वतंत्र “शिवसेना मदत केंद्राचे” उद्घाटन

अंबरनाथ ,जाफर वणू –  बाळासाहेबांना वाटेल हेवा अशी निःस्वार्थ जनसेवा करणारे बदलापुर शहर शाखाप्रमुख भरत नवगिरे ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोनिवली येथील “कोव्हिड केअर सेंटर” येथे स्वतंत्र शिवसेना मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.

बदलापुर शहराध्यक्ष वामनदादा म्हात्रे ह्यांचे कड़वे समर्थक म्हणून शहर शाखाप्रमुख भरत नवगिरे ह्यांच्या दि.16 जुलै 2020 रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सोनिवली येथील “कोव्हिड केअर सेंटर” येथे स्वतंत्र शिवसेना मदत केंद्राचे उद्घाटन शिवसेना बदलापुर शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे ह्यांच्या हस्ते करण्यात आली.

कोरोनाच्या महामारी व लॉकडाउन दरम्यान आपल्या जिवाची पर्वा न करता 80% समाजकारण आणि 20 % राजकारण शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिकवणीनुसार तसेच पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बदलापुर शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे ह्यांच्या आदेश्यानुसार सतत कार्यरत असणारे बदलापुर शहरातील एक आदर्श उद्योजक, युवानेते तथा शहर शाखाप्रमुख भरत नवगिरे ह्यांना बदलापुर शहरातील वासियांच्यावतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याच बरोबर समाज कारणात एकनिष्ठ काम करणारे युवानेते भरत नवगिरे ह्यांनी कोरोनाच्या महामारी व लॉकडाउनच्या काळात बादलपुरच्या गोरगरिब जनतेसाठी मोठे कार्य केले आहेत. सदरवेळेस त्यांनी शेकडो नागरिकांना माक्स, सँनिटायझर, जंतुनाशक फवारणी, अन्नधान्य, जिवनावश्यक वस्तु, अर्सेनिक अल्बम – 30 च्या गोळ्या वाटप, रक्तदान शिबीर, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र व पोलिस चौकशी करून उपासमार होत असलेल्या परप्रांतियांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था आपल्या स्वखर्चानी केले आहेत. तसेच समाजकारण ह्या दुष्ठीकोनातून भरत नवगिरे ह्यांनी अनेक उपक्रम राबऊन नागरिकांच्या समस्या सोडवित असतात.

बदलापुर सोनिवली “कोव्हिड केअर सेंटर” येथील शिवसेना मदत केंद्रात खालीलपैकी समस्या सोडविण्यात येतील.
1) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे का ?
2) हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहे का ?
3) रुग्णवाहिका सेवा हवी आहे का ?
4) होम क्वारनटाइन असल्यास मदत हवी आहे का?
5) कोव्हिड सेंट्रला / क्वारनटाइन सेंटरमध्ये कोणाला कसलाही त्रास होत असेलतर.
6) साफसफाई संदर्भात समस्या आहे का?
अशा कोणत्याही प्रकारच्या समस्या जाणवल्यास 7385239331 / 7249559331 ह्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा.

दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर व गोपाल कांबळे यांच्यासह अनेक दिव्यांग लोकांचा ‘मनसे’त प्रवेश….

palghar
Comments (0)
Add Comment