भांडण सोडवणाऱ्या महिलेलाच हाणमार करून हात मोडला
माजलगांव, प्रतिनिधी – भांडणे करणाऱ्यांचे सुटले अन् सोडवणाऱ्यावर बेतले.याचा प्रत्यय भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला आला आणि हात मोडला. याबाबत माहिती अशी की, माजलगांव तालुक्यातील फुलसिंग तांडा येथे १९एप्रिल रोजी च्या सकाळी ९:४५वा.सुमारास लिंबाजी फुलसिंग राठोड यांच्या रेशन दुकाना समोर शिवाजी पांडु राठोड व नितीन मिठ्ठू राठोड यांचे दुसऱ्या सोबत भांडण चालले होते हे भांडण वाढून विपरीत परिणाम होऊनये म्हणून याच तांड्यातील भावकीतील एक महिला मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना शिवाजी राठोड याने आमच्या सोबत गेल्या वर्षी भांडण का केले होते. याची कुरापत काढून शीवीगाळ करत हातातील काठीने महिलेच्या उजव्या हातावर मारा करून हात फ्रक्चर केला तर नितीन राठोड ने शीवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पिडीत महिलेने हातावर उपचार करून २४एप्रिल शुक्रवार रोजी ग्रामीण पो.ठाण्यात दिल्याने वरील नामे दोन्ही आरोपी विरोधात गु.र.नं१०८/२०२०वरुन भादंवि. कलम ३२५, ५०४, ५०६.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पो.हे. कॉ.वडमारे करत आहेत.