खडकवासला, प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक ३९ धनकवडी-आंबेगाव पठार मध्ये स्व. शिवाजीराव आहेर पाटील चौक, धनकवडी येथे नगरसेविका वर्षाताई तापकीर यांच्या संकल्पनेतून आणि स्व.उत्तमरावजी भिंताडे फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जय हिंद विजयी शिल्पाचा लोकार्पण सोहळा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते काल उत्साहात संपन्न झाला. यावेळी धनकवडी – आंबेगाव पठार परिसरातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला व त्याच बरोबर १५ ऑगस्ट २०२१ रोजी आफ्रिका खंडातील किलिमांजरो हे सर्वोच्च शिखर सर करून भारताचा ७५ फुटी झेंडा फडकावून विश्वविक्रम करणारी आपल्या धनकवडीची सुकन्या कु. स्मिता घुगे हिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर ,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, सभागृह नेते गणेश बिडकर, भा.ज.पा. पुणे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे, अरुण राजवाडे, युवा नेते गणेशदादा भिंताडे, नगरसेविका सौ.मोहिनीताई देवकर, भाजपा खडकवासला विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक, अभिषेक तापकीर, महेश भोसले, आप्पासाहेब धावणे, सत्यवान कामथे, देवीदास मोरे, दादासाहेब देवकर, उल्हास खुटवड, राजु डांगी, माऊली पांचाळ, रणधीर गायकवाड, सागर साबळे, शिरीष देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अरविंद साठे, वामनराव साखरे, सुधीर ओक, रामकृष्ण चिंचकर, बाळासाहेब बोत्रे, किरण जोशी, उमेश खंडेलवाल, विजय क्षीरसागर, तुषार आहेर, सचिन धुमाळ, गणेश दिघे, विशाल पोमण, प्रसाद शेडे, अरविंद पोमण, विक्रांत तापकीर, मिलिंद क्षीरसागर, माधव वाघ, शिशिर दहीतुले, उमेश भोसले, सागर भोसले, केतन यादव, श्रेयस फुगे, स्वप्निल क्षीरसागर, रोहन जाधव, अमेय शिंदे, तेजस कुलकर्णी, कानिफनाथ शिंदे, मयुर दातीर, करण शहा, अक्षय गायकवाड, यश कदम, आविष्कार राजहंस, हर्षप्रित सणस तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व धनकवडी भागातील सर्व संघटना व गणेश मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.