भुसावळ शहरातील काही भाग १४ दिवसापर्यंत सील : उपविभागीय अधिकारी

भुसावळ, लियाकत शाह – शहरातील एका ४३ वर्षीय महिला कोरोना पॉझेटिव्ह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दुपारी महिलेच्या पतीला व मुलाला ताब्यात घेतले आहे.तसेच प्रशासनाने दिड किलोमीटरच्या परिसराला सिल करण्यात निर्णय कैर कमेटीच्या बैठक मध्ये घेतला.

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील महिलाने खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. दिनांक २१ एप्रिल रोजी महिलेचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते.दिनांक २५ रोजी अहवाल प्राप्त झाला. त्यात येथील महिला कोरोना पॉझेटिव्ह आढळून आली आहे.या अनुषंगाने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात तातडीची कैर कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली.यामध्ये गांधी पुतळ्यापासून तर कंडारी पर्यंतचा दिड किलोमीटरचा परिसर १४ दिवसासाठी सिल करण्यात आला आहे.घरातून परिसरातील कुणीही व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही.संपूर्ण परिसराला स्वच्छ व फवारणी करण्यात येणार आहे. सकाळी ७:३० वाजेला समता नगर भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार आहे.तसेच त्यांचे फॉर्म सुद्धा भरण्यात येणार आहे.यासाठी परिसरातील नागरीकांनी सहकार्य करावे. सर्दी,खोकला यासारखे लक्षण आढळून आल्यास घटनास्थळी डॉक्टरांना बोलावून उपचार करण्यात येणार आहे. तसेच यानंतर काही लक्षणे आढळून आल्यास जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात येईल.आज रात्रीपासून परिसराला सील करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे कॉटरमध्ये राहणाऱ्यांचाही समावेश असणार आहे.या परिसरातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा प्रशासन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच इतर भागातील भाजीपाला व शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने शासनाच्या ठरविण्यात आलेल्या वेळेनुसार सुरू राहणार आहे.सिल करण्यात आलेल्या भागात पोलीस बंदोबस्त लावण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी बोलविण्यात आलेले नाही.गरज भासल्यास पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांनी बंदोबस्तासाठी अतिरीक्त पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.यावेळी बैठकीला तहसीलदार दिपक धिवरे, मुख्याधिकारी करुणा डहाळे,पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड, शहर पो.स्टे. निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पो.स्टे.निरीक्षक दिलीप भागवत,रेल्वे हॉस्पिटलचे डॉ.पी के. सामंतराय (सी.एम.एस) डॉ.राकेश मल्होत्रा (एस.सी.एम.एस) डॉ.अखिलेश (सी.डी.एम) ओ,वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांच्यासह पालिका व तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

Comments (0)
Add Comment