भेंडाळा फाटा येथे गोडाऊनला भीषण आग

 सचिन कुरुंद
गंगापूर,दि 23 ः
भेंडाळा फाटा  येथील दोन गोडाऊनला भीषण आग लागली आगीत एक कोटी रुपयांच्या कापसाच्या गाठी जळुन खाक ही आग दुपारी दोन वाजता आटोक्यात आणली.
औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावरील भेंडाळा फाटा येथील ओमेगा गोडाऊनला भीषण आग  लागुन  गोडाऊन मधील साठवून ठेवलेल्या कापसाच्या गाठीची अक्षरशाः जळून  राख झाली आहे. हि घटना रात्री बारा वाजे दरम्यान घडली असून जवळपास अंदाजे एक कोटीचे नुकसान झाल्याचे वर्तवण्यात येत आहे.जळालेल्या  कापसाच्या गाठी चार जणांच्या मालकीच्या असल्याची माहिती पुढे येत आहे.
गंगापूर तालुक्यातील भेंडाळा,पिंपळवाडी,शिवारातील गट क्रमांक १८ मधील संतोष रुपचंद आढागळे व सुमित रुपचंद आढागळे  या दोघा भावाचे मालकीचे तिन गोडावून आहे.त्यांनी इतरांना साठवणीसाठी भाडे तत्त्वावर गोडावुन दिले होते. या तिन  ही गोडावून मध्ये कापसाच्या तीन हजार मेट्रिक टन कापसाच्या गाठी असल्याचे सांगितले जाते.  या गाठी चार जिनिंग धारकाच्या असल्याचे सांगितले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टाळला. या आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही.आग विझविण्यासाठी औरंगाबाद महानगर पालिका तसेच वाळूज येथील गरवारे येथून अग्निशामक दलासह गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या. गंगापूर पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्फत  अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.आग विझविण्यासाठी गंगापूर पोलीस स्टेशनचे पो.नि.संजय लोहकरे,सहाय्यक पो.नि.शकील शेख, पोहेका कैलास निभोंरकर,गोपनीय शाखेचे योगेश हारने ,अग्निशामक दलाचे सोमनाथ साळवे,भरत वाघ,विशाल सांगळे,विनायक टीमकर,विक्रम भुईगळ,लक्ष्मण कोल्हे,विक्रम दुधे,सुजित कल्याणकर, इम्रान पठाण,परेश दुधे,सुभाष दुधे,सय्यद,आदींनी प्रयत्न केले.

Comments (0)
Add Comment