सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना फेस शिल्डचे वाटप
माजलगाव, प्रतिनिधी – मतदार संघात कोरोना विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलीस व सर्व विभागातील कर्मचारी यांचेसह पत्रकारांना अडीच हजार फेस शिल्डचे वाटप आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते तहसील कार्यालयात दि. ४ सोमवारी वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, भाई गंगाभीषण थावरे, बाजार समिती सभापती अशोक डक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांची उपस्थिती होती. जगासह देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातील महसूल, पोलीस, आरोग्य, विज, पंचायत समिती, नगर परिषद आदी विभागातील कर्मचारी तसेच बरेच पत्रकार रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्यांच्या साठी आमदार प्रकाश सोळंके यांनी पुढाकार घेतला असून सोमवारी तहसील कार्यालयात फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराशी दोन हात करणारे डॉक्टर, पोलीस यासह सर्वच विभागातील कर्मचारी यांच्या आरोग्याची देखिल काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच अडीच हजार फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.