मनमाङ , प्रतिनिधी – मनमाङ येथील तांबोळी चाळ येथिल बाकलीवाल भवन शेजारी असलेल्या कचरा कुंडी मुळे संपूर्ण चाळीत सतत घाणीचे साम्राज्य पसरलेले असायचे,चाळितील सर्वच रहिवाश्यांना अतिशय त्रास सहन करून रोगराईला सामोरे जावे लागत होते , संतोष बाकलीवाल व पुर्ण परीवार,प्रदिप बोगावत परिवार, असलम बागवान परीवार,श्रीमती रेहाना शेख परीवार,
राठोड परीवार,अब्बासी भारमल परीवार, शब्बीरभाई भारमल परीवार,
लक्ष्मण आप्पा गवळी परीवार,व ईतर सर्वच रहिवाशांना अतिशय
त्रास सहन करावा लागत होता.
तांबोळी गल्लीतील सीमेंट रोड चे काम निघाल्याने सर्वानूमते कचराकुंडी हटवण्याचा सर्वांनी निर्धार केला, त्यासाठी सर्वात महत्वाचा पुढाकार मिसेस तब्बसुम आबिद शेख,(श्रीमती रेहाना आसिफ शेख यांची कन्या,नगरपालिका ऑफीसर रीयाज ईस्माईल शेख यांची भाची आम्हा सर्वांचींच भाची )
हिचा व प्रदिपभाऊ बोगावत यांचा तसेच श्रीमती रेहाना शेख यांचा होता.
सर्वांनी पुढाकार घेउन सर्व रहिवाशांना कळकळिची विनंती करत ती कचराकुंडी हटवण्यास भाग पाडले,घंटा गाडी चाळित आणण्यास भाग पाडले, नविन झालेल्या संपूर्ण सिंमेट रोडवर पाणी टाकण्याचे कामही तिघेही जातीय ईमाने ईतबारे करीत आहे,चाळितील स्वच्छतेकडे जातीय लक्ष देत आहे.
सर्वांची यांना पुर्ण साथही मिळतेय, यांच्या कार्याने संपुर्ण चाळीला यांनी आपलेसे केले, या साठी यांचे कौतुक करावे तीतके कमीच आहे, सर्व चाळितील रहवाशींनी सर्वानुमते यांचा कोवीडयोध्दा म्हणुन सत्कार करण्याचे मनोगत व्यक्त केले.
मनमाड ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष संतोष बाकलीवाल यांनी गुरूद्वारा गुपतसर साहिब प्रबंधक बाबा रणजित सिहंजी यांचे अनुमतीने व आशीर्वादाने यांचा प्रमुख पाहुणे डाॅ सुनिलभाऊ बागरेचा यांचे हस्ते शाल सन्मानपत्र देवून भव्य सत्कार करण्यात आला,श्रीमती रेहाना शेख यांनाहि शाल गुलाबपुष्प देउन सन्मानित करण्यात आले,तसेच डाॅ सुनिलभाऊ बागरेचा यांचे ही कोरोना महामारीत केलेल्या कार्याची दखल घेउन व अम्रुत नागरी पतपेढीचे नुतन चेअरमन पद स्विकारले म्हणुन त्यांचाहि सन्मानपत्र शाल श्रिफल देउन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सर्व तांबोळी चाळीतील रहिवासी उपस्थित होते, सर्वांनी सत्कारार्थी यांचे अभिनंदन करून खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संतोष बाकलीवाल यांनी सुत्रसंचलन केले, कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विशेष:ता प्रदिपभाऊ बोगावत ,अब्बासी भारमल, आबिद शेख, जावेद शेख, मंगलेश बाकलीवाल व सर्व रहिवांशिनी प्रयत्न केले शेवटि डाॅ सुनिलभाऊ बागरेचा, तब्बसुम शेख,श्रीमती रेहानाजी शेख, प्रदिपभाऊ बोगावत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सर्वांनी मास्क लाउन सोशल डिस्टन्सींग चे पालन करत छोटेखानी कार्यक्रम पार पाडला.