Notice

: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1164

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1165

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1166

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1177

मनमाड जंक्शनसह आठवडे बाजार आणि संपूर्ण शहर जनता कर्फ्यूनिमित्त बंद

मनमाड : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिक कडेकोट बंदोबस्त पाळत आहेत. मनमाड जंक्शनसह आठवडे बाजार आणि संपूर्ण शहर जनता कर्फ्यूनिमित्त बंद आहे.

मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. येथून दिवसभर जवळपास १५० प्रवाशी प्रवास करतात. मात्र, जनता कर्फ्यूनिमित्त रेल्वेस्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळाला. रविवारचा आठवडे बाजारही रद्द करण्यात आला आहे. तर, शहरातील संपूर्ण दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत.

पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी पोलिसांच्या मदतीने कालपासूनच संपूर्ण शहरात आवाहन करत रविवारी दुकाने बंद करण्यासाठी सांगितले. त्याचाही मोठा फायदा झाला आहे. तर, मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग देखील आज पूर्णपणे रिकामा होता. तर, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आज बंद ठेवण्यात आली. एकंदर कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी पोलिसांच्या मदतीने कालपासूनच संपूर्ण शहरात आवाहन करत रविवारी दुकाने बंद करण्यासाठी सांगितले. त्याचाही मोठा फायदा झाला आहे. तर, मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग देखील आज पूर्णपणे रिकामा होता. तर, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आज बंद ठेवण्यात आली. एकंदर कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

batmibreaking newslatest newsmmaharashtramarathinewsonline newsspecial newsताजी बातमीन्यूजबातमीब्रेकिंग न्यूजमराठीमहत्वाची बातमीमहाराष्ट्र
Comments (0)
Add Comment