मनमाड,प्रतिनिधी :- कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाउन असल्याने बाहेर गावच्या अडकलेल्या पुणे येथील एका महिलेचा बस स्थानकात भुकेने व्याकुळ झाल्याने तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चालक व वाहकांच्या लक्षात आल्याचे समोर आल्याने तीचा तातडीने शोध लागला असून तीचा मुलगा येथे आल्यानंतर तिच्यावर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.दरम्यान आईचा मृतदेह पाहुन तिच्या मुलाचा शोक अनावर झाल्याचे दिसून आले.सुनीता फडनीस, वय-६५, रा.सातर जि.पुणे असे या दुर्दैवी मयत महिलेचे नाव आहे.
करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद(सील) करण्यात आल्या होत्या.त्यामुळे बाहेरगावचे अनेक प्रवासी अडकले होते तर काही ही ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपापल्या घरी गेले होते.तर बेघर,भिकारी अडकलेले प्रवासी यांना राहण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मनमाड येथील बसस्थानकात सोय करून देण्यात आली होती.तर अनेक अन्नदाते,सामाजिक संस्थांचे हात पुढे येऊन रोज या बसस्थानकातील या बेघर नागरिकांना चहा,नास्ता व जेवणाची सोय करून देण्यात आली होती.
मात्र काही दिवसानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक जणांचे खाण्या पिण्या वाचून मोठे हाल झाले.त्यामुळे ते आजारी पडले आणि अंथरुणावर खिळून राहिले.अशीच काहीशी परिस्थिती फडनीस या महिलेच्या बाबतीत घडली असून भुकेने तीचा मृत्यु झाल्याची चर्चा असून दोन दिवसापूर्वी या महिलेेचा बसस्थानकाच्या आवारात मृत्यू झाला.यावेळी तो पहावेनासा झाला होता.
सदरची बाब येथील बस चालक व वाहक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी मृतदेहाची चौकशी केल्यानंतर तिच्याजवळ एक आधार कार्ड सापडले त्यावरून पोलिसांनी तपास करून ती पुणे जिल्ह्यातील सातर या गांवची असल्याचे समजल्यानंतर वृद्ध महिलेचा मुलगा येथे आल्यानंतर आपल्याच आईचा मृतदेह असल्याची खात्री झाल्यानंतर तो शोकमग्न होऊन हंबरडा फोडला.मात्र मृतदेह आपल्या गावी न नेता त्याने येथील अमरधाम मध्ये आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले.यावेळी अनेक सामाजिक नागरिकां मदत केली.
गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी
आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});