मनमाड शहरात सुशिक्षित डॉक्टरांच्या आत्महत्येने खळबळ

मनमाड – येथील गेल्या काही दिवसापासून मनमाड शहरामध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे तसेच आज श्रावस्ती नगर भागातील एका सुशिक्षित डॉक्टर ने आपल्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्यामुळे शहरात तर्कवितर्क काढले जात आहे.त्यांच्या वडिलांनी पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे.

श्रावस्ती नगर येथे राहणारे प्रणवराज राजेंद्रप्रसाद तिवारी वय ३२ हे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून यांचा शहरातील नेहरू भवन परिसरात दवाखाना होता अशी माहिती समोर आली असुन ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते.मात्र त्यांनी अचानक टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या का केली असावी अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे.मात्र या आत्महत्येमुळे मनमाड शहरातील नागरिकांची सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून एका सुशिक्षित कुटुंबातील असलेल्या डॉक्टरांने राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.नागरिकांनी तातडीने मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून याबाबत पोलिसांना कळविले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

BREAKING: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या अंतर्गत भारतात 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी
प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?



Comments (0)
Add Comment