हिंगणघाट ,दशरथ ढोकपांडे – घरघुती वीज ग्राहकांचे वीज बिल सरसकट माफ करा किंवा मार्च,एप्रिल,मे या तीन महिन्याचे १००/- रु प्रति महिना वीज देयके द्या यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंतजी गडकरी व मनसे वर्धाजिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांच्या नेतृत्वात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन त्यांचा सदन कार्यालयात काळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान करून वाढीव वीजबिलाबद्दल सरकारचा निषेध केला व आंदोलन करण्यात आले.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे गरीब,मजूर व मध्यम वर्गातील लोकांचा हाताला काम उरलेले नाही. अनेक कारखाने, छोटे-मोठे व्यवसाय कुटीर उद्योग, गृह उद्योग,लघु उद्योग बंद पडलेले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे राज्यात अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच कारणामुळे जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. सामान्य जनता शासनाकडे मदतीची वाट पहात आहे.
राज्यातील संपूर्ण ठिकाणी विजेचे बिल दुप्पट-तिप्पट आलेले आहे सामान्य माणूस एवढे वीजबिल कुठून भरणार तसेच ‘मध्य प्रदेशातील शासनाने प्रति महिना शंभर रुपये वीजबिल प्रत्येक वीजबिल धारकास आकारले मग हे आपल्या महाराष्ट्रात का होऊ शकत नाही.? आज सामान्य लोकांचा हाताला कामे नाही एकीकडे लॉकडाऊन दुसरीकडे रोजगार बंद असल्याने संपूर्ण कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत वीजबिल भरण्यास नागरिकानंकडे पैसे नाहीत त्यामध्ये वीजबिल दुप्पट-तिप्पट आले त्यामुळे सर्व सामान्य नागरिक वीजबिल भरू शकत नाही. असा सवाल हेमंतजी गडकरी व अतुलभाऊ वांदिले यांनी ऊर्जा मंत्र्यांना केला असता त्यांनी प्रश्नांची उत्तरे समाधान कारक न देता टाळाटाळ केली. यावर सकारात्मक विचार करून विजबिलातून मुक्त करून जनतेला दिलासा द्यावा.
यावेळी उपस्थित मनसे जिल्हाउपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हासचिव सुनील भुते, वा.सेना जिल्हासंघटक रमेश घंगारे, आरोग्य सेना जिल्हाध्यक्ष उमेश नेवारे, योगेश चनापे, श्याम पुनियानी, राजू सिन्हा, गजानन कलोडे,अमोल मुडे, नरेश भोयर, सचिन इंगोले,आदी पदाधिकारी व मनसेसैनिक उपस्थित होते.
प्रतिक्रिया :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात चार महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे अशात गोर, गरीब, व सामान्य मजूर लोकांचा हाताला काम नाही.अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहे, अशा परिस्थतीत ते वीजबिल भरणार कुठून ते स्वतःचा व कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवत असेल याचा विचार कराला हवा अशा गंभीर परिस्थित विजेचे बिल दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढून आलेले आहे. या माय-बाप सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी संपूर्ण वीजबिल माफ करावे यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सदन गृहस्थांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली परंतु नितीन राऊत यांनी समाधान कारक उत्तरे न देता उत्तरे देण्यास टाळाटाळ केली.
अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा