मरयम फातेमाने ठेवला पहिला रोजा

परभणी, प्रतिनिधी – शहरातील शाही मस्जिद परिसरातील सय्यद सगीर अहमद यांच्या आठ वर्षाच्या मरयम फातेमा या मुलीने रमजानचा पहिला रोजा ठेवल्याने या मुलीचे कौतुक करण्यात येत आहे.
मुस्लीम समाजात रमजान महिना पवित्र मानला जातो या महिन्यात मुस्लीम समाजातील नागरिक महिनाभर उपवास धरतात ,तसेच पाचवेळेस नमाज अदा करण्यात येत आहे रात्री विशेष तराबीची नमाज १ तास पडण्यात येते परंतू सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सर्व नमाज आपल्या घरातच पडण्याचे आवाहन प्रशासन व मौलवींच्या वतीने करण्यात आले आहे.
या महिन्यात दान धर्म करून गोरगरींबांना मदत करण्यात येते. अल्लाहची भक्ती करून रोष कमी करण्यासाठी तीस दिवसाचे उपवास ठेवण्यात येत आहे. या महिन्यात लहान मुलांसह वयोवृध्द नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास धरतात.
मरीयम फ़ातेमाच्या पहला रोजा बदल नातेवाईक परिवारतील प्रत्येकानी शुभचछा देऊन आशीर्वाद दिला.

Comments (0)
Add Comment