मनमाड – मनमाड नगरपरिषद अंतर्गत मलेरिया विभागाच्या वतीने मनमाड शहरात आनंदवाडी, सुभाष नगर, मुक्तांगण, गांधी चौक, नेहरू भवन मागील भाग, एकलव्य नगर, आठवडे बाजार, रेल्वे स्टेशन रोड यासह संपूर्ण मनमाड शहरात मोहीम घेऊन प्रभावीपणे कोरोना प्रतिबंधात्मक औषध फवारणी मोहीम घेण्यात आली. मा. मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर सो व मा. नगराध्यक्षा सौ पदमावती ताई धात्रक सो यांनी मलेरिया विभागाचा दैनंदिन कामाचा आढावा घेऊन शहरात प्रभावीपणे औषध फवारणी होणेकामी मार्गदर्शन केले. यावेळी मलेरिया विभागाचे सुकदेव बुल्हे, विक्रम साळवे, कैलास जाधव, अशोक गरुड, विलास खैरनार, प्रताप निकम, प्रकाश डिंबर, बाबासाहेब काळे, कैलास सानप, शंकर कांबळे, रियाज शेख नारायण ईमले, जुबेर पटेल, राहुल आढाव, रोहित शिंदे यासह सर्व मलेरिया विभाग कर्मचारी सदरच्या मोहिमेत सहभागी झालेले आहे.