महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य रक्तदान शिबीर संपन्न; १०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

पेण – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांच्या विद्यमानाने कोरोना सारख्या जागतीक महामारीच्या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी, पेण येथील जैन हाॅल येथे सर्व नियमाचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालय ब्लड बँकेला निमंत्रित करण्यात आले होते.सध्या जगभरात कोरोना सारख्या जागतीक महामारीने थैमान घातले आहे. यामुळे रक्तदान करणाऱ्यांचे देखील प्रमाण घटले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व त्याला उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला.रक्त दात्यांनी  रक्त दान केल्या मुळे प्रमाणपत्र देण्यात आली तसेच विशाल बाफना यांच्या कडून रक्त दात्यांना चहा,बिस्कीट, फळे (नाष्टा)तसेच भेट वस्तू देण्यात आली.यामुळे सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच श्री. रुपेश पाटील यांचे कौतुक होत आहे.यावेळी विशाल बाफना, गुरु बाफना, मनसे कार्यकर्ते आदी उपस्थितत होते.यावेळी बोलताना रुपेश पाटील यांनी सांगितले कि कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉक डाउन असल्याने कोणी रक्तदान करत नसल्याने देशात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने आज मनसेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तर यापुढे रक्ताची गरज लागणार असल्याने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे विशाल बाफना यांनी संगितले.
Comments (0)
Add Comment