भिवंडी, प्रतिनिधी – कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आपल्या राज्यात संचारबंदी लागु केली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरा बरोबर ग्रामीण भागातील पत्रकार देखील अत्यावश्यक सेवेतील नागरीकांप्रमाणे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. जीवावर उदार होऊन पत्रकार कोरोना बाबत आपल जीव धोक्यात टाकून वृत्तांकन करत आहेत. व आपले कर्तव्य पार पाडत आहेत. पत्रकारांना देखील आपल्या स्वतःचे घर आहे. परिवार आहे म्हणून परिस्थितीचे व पत्रकारांचे गांभीर्य लक्षात घेता. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा यांच्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांना गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर,चहापावडर,हळद,मीठ, मसाला,गरम मसाला, बटाटे, कांदे, चवळी, तूरडाळ, साबण अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ग्रामीण भागातील पत्रकारांना दिलासा दिला आहे. यावेळी माक्स बांधून व सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा व कोकण विभागीय अध्यक्ष भगवान चंदे व ठाणे जिल्हा सचिव नरेश पाटील , ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, शहापुर तालुका अध्यक्ष सुनील घरत, कल्याण तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी भिवंडी ,शहापूर कल्याण, मुरबाड ,उल्हासनगर, बदलापूर परिसरातील पत्रकार संघातील आणि पत्रकार संघा बाहेरील शंभर पत्रकारांना अन्नधान्य आदी सर्व जीवनवश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
ग्रामीण भागातील पत्रकार नागरिकांपर्यंत नेहमीच आपल्या लेखणीतून बातम्या पोहोचवत असतो. परंतु लॉकडाऊनच्या काळात पत्रकारांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. पत्रकार देखील एक माणूस आहे. त्याचा देखील परिवार आहे. सध्या आर्थिक गणित कोलमडले आहे. म्हणून आमचा पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष व कोकण विभागीय अध्यक्ष भगवान चंदे यांनी बोलतांना सांगितले.