महिला आरोग्य कर्मचाऱ्यास मद्यपीने केली मारहाण

माजलगांव, प्रतिनिधी – माझ्या हनुवटीला झालेल्या दुखपतीस लवकर पट्टी का करीत नाहीस म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. रामा सखाराम पवार असे आरोपीचे नाव आहे. तो जखम झाल्याने ग्रामीण रुग्णालयात गेला. यावेळी त्याने मद्द प्राशन केले होते. नशेत त्याने पट्टी का करत नाही असे विचारले.
यावेळी महिला आरोग्य कर्मचारी शारदा बाबुराव गायसमुद्रे यांनी ओपीडी बंद आहे. आधी तुम्ही डॉक्टरांना दाखवा व नंतर तुम्हाला पट्टी करता येईल असे म्हणताच त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी शारदा गायसमुद्रे यांनी माजलगांव शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून रामा पवार याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि. अविनाश राठोड हे करीत आहेत. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षा पुरविण्याच्या मागणीसाठी रुग्णालयाबाहेर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Comments (0)
Add Comment