माऊली आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवनेरी बसने अलंकापुरीतून रवाना

आळंदी देवाची – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुका आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत विभागीय आयुक्त यांच्या परवानगीनी फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली असून यात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, शितोळे सरकार, पालखी सोहळा मालक राजेंद्र अरफाळकर, चोपदार, चवरीधारक, अब्दागिरीधारक, श्री चे शिपाई, पंखा धारक,कर्णधारी सेवक, पुजारी, दिंडी.क्र १ रथापुढीलचे ४ प्रतिनिधी, रथापुढील २ आणि ३ चे प्रत्येकी १ प्रतिनिधी, रथामागील दिंडी क्र. १,२,३ चे प्रत्येकी १ प्रतिनिधी या २० लोकांना परवानगी देण्यात आली असून कडक पोलिस बंदोबस्त पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे.

दशमीच्या दिवशी आज पहाटे पाच वाजता पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते विधीवत पूजा पार पाडून, किर्तन सेवा पार पाडून नैवेद्य दाखवून, दुपारी १ वा. आकर्षक फुलांनी सजवलेल्या शिवनेरी बस ने अलंकापुरीतून पालखी सोहळा मार्गावरून पंढरपूरकडे विठू नामाच्या गजरात मार्गस्थ झाली, यावेळी सर्व २० जणांची कोरोणा टेस्ट करण्यात आली असून त्यांना संस्थान कमिटीने मास्क, फेसशील्ड, सेनीटाईज चे वाटप करण्यात आले आहे, मंदीर परिसरात यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खेड चे प्रांत संजय तेली यांच्या देखरेखीखाली पालखी सोहळा पार पाडणार आहे ते स्वतः पालखी सोहळ्यासोबत असणार आहे पालखी सोहळा मार्गावर कोणत्याही ठिकाणी न थांबता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि आळंदी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले की प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आळंदीहून माऊलींच्या चल पादुका पंढरपूर कडे शिवनेरी बस ने पारंपारिक पालखीमार्गावरुन मार्गस्थ होणार आहे वाखरी वर पोचल्यावर पारंपारिक पद्धतीने अग्रक्रमाने सर्व पालख्यांना पंढरपूर पर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्याची मागणी केली असून प्रशासन काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे, तसेच सर्व संतांच्या पालख्यांना काला करुनच पंढरपूरकडून परतीच्या प्रवासाला परवानगी देण्यात यावी अशी ही मागणी प्रशासनाला केली आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आज दुपार पासून ते गुरवार पर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
read this … सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट
BREAKING: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या अंतर्गत भारतात 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी



आषाढी एकादशीसंत ज्ञानेश्वर महाराज
Comments (0)
Add Comment