माजलगांवात आ.पडळकरांच्या समर्थनार्थ धनगर समाजाचा पुढाकार, पडळकरांच्या प्रतिमेस घातला दुधाभिषेक

माजलगांव, प्रतिनिधी – भाजपाचे विधान परिषदेचे आ.गोपिचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ माजलगांव येथे धनगर समाजाने पुढाकार घेतला असून मंगळवारी शिवाजी चौकात आ. पडळकर यांच्या प्रतिमेस धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुधाभिषेक घालून त्याचे समर्थन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ.पडळकर यांचा निषेध करत धनगर समाजाबद्दल असभ्य भाषा वापर करुन आ.पडळकरांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले होते,त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी १०:०० वाजता माजलगांव येथील शिवाजी चौकात सकल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आ.पडळकर यांच्या समर्थानार्थ त्यांच्या प्रतिमेस दुग्ध आभिषेक करण्यात आला.

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सरवदे मल्हार सेनेचे आशोक डोणे, नारायणराव भले, मल्हार धनगर समाजाचे संतोष देवकते, मल्हार सेनेचे विलास नेमाणे, सरपंच किसन वगैरे, सरपंच कल्याण कसपटे, कल्याण गवते, सुखदेव मुळे, बाबा हांडे, मुक्तीराम आबुज, मंजुळदास कुंडकर, तात्या पांचाळ, शंकर चोरमले, गजानन देवकते, गणेश सातपुते यांची उपस्थिती होती.

READ MORE – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
READ THIS – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट



Comments (0)
Add Comment