भाजपा तालुकाध्यक्ष अरुणराव राऊत यांची मागणी
माजलगांव, प्रतिनिधी – जीव घेण्या कोरोना साथी पासून स्वतः चे व कुटुंबाचे संरक्षण करता यावे, यासाठी माजलगांव सहकारी साखर कारखान्याने आपल्या सभासदांना सेनीटायजर चे मोफत वाटप करावे अशी मागणी भाजप तालुका अध्यक्ष अरुणराव राऊत यांनी केले आहे.
याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोराना साथीने जगात थैमान घातले असुन या जीव घेण्यासाथीला रोखण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सह केंद्र व राज्य सरकार खुप मोठे प्रयत्न करीत आहे.त्याच बरोबर विविध सामाजिक संस्था, समाजसेवक, उद्योजक,अनेक जन आपण अशा संकटात समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने मदत करीत आहेत. कोरोना संकटामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
म्हणून कोरोना पासून स्वतः चे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे.परंतु यासाठी आवश्यक असणारे सेनीटायजर,हात धुण्या चे लिक्वीड इ. गोष्टींचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून माजलगांव सहकारी साखर कारखान्याने आपल्या सर्व सभासदांना सेनीटायजर चे मोफत वाटप करावे,अशी मागणी भाजप तालुका अध्यक्ष अरुणराव राऊत यांनी आपल्या निवेदनात केली आहे.
माजलगांव कारखान्याने सभासदांना सेनीटायजरचे मोफत वाटप करावे
