- कापूस लागवड अंतिम टप्यात तर सोयाबीन , मुगाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग
माजलगांव, प्रतिनिधी:- मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच वरुणराजाने तालुक्यात जोर ; धार ‘ हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे . पहिला पाऊस पडताच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती.
आता पेरणी योग्य पाऊस झाल्याने कापसाची लागवड जवळपास अंतिम टप्यात असून सोयाबीन , मुगाच्या पेरणीची लगबग सुरु आहे.आतापर्यंत तालुक्यात जवळपास ५० टक्के खरीपाची पेरणी उरकली असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले .
दरवर्षी मृग नक्षत्र कोरडे जात असले तरी , यावर्षी मात्र मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच वरुणराजाने तालुक्यात दमदार हजेरी लावली . शेतमालाचा उतारा चांगला येत असल्याने मृग नक्षत्रात पेरणीची वाट पाहणान्या शेतकऱ्याची अपेक्षा यावर्षी पूर्ण झाली आहे.
सुरुवातीलाच पावसाने आगमन केल्याने बियाणे , खते – खते घेण्यासाठी बाजारात शेतकन्यांची झुंबड उडाली होती . पेरणीसाठी आवश्यक असणाऱ्या खते , बियाणाची शेतकन्यांनी एकदाच खरेदी केल्याने बाजारात रासायनिक खातासह युरीयाचा तुटवडा निर्माण झाला आहे .
कापसाची लागवड लवकर झाल्यास चांगला उतारा येत असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच कापूस लागवडीवर भर दिला होता.आता जमिनीत ओलावा भरपूर असल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन , मुगाच्या पेरणीसाठी लगबग सुरु केली असून चार दिवसांत तालुक्यातील खरीपाची संपूर्ण पेरणी होण्याची शक्यता आहे .
शेतकऱ्यांसाठी मृग नक्षत्रात होणाऱ्या पेरणीला मोठे महत्व असताना यावर्षी वेळेवर आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे .
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});