माजलगांव , प्रतिनिधी:- माजलगांव तालुक्यात यावर्षी पावसाने दमदार सुरुवात केली असून सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वहात असून तालुक्यात ४२ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान पावसाने दमदार सुरूवात केल्याने शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे.पेरनियोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्याची पेरणीसाठी लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.
अनेक वर्षानी या वर्षी बरोबर दि.७ जनु ला पावसाने आगमन करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचे काम केले,मात्र ५-६ दिवस खंड पडला होता. सोमवारी सायंकाळी माजलगांव तालुक्यात जोरदार पावसास सुरुवात झाली, रात्री व मंगळवारी पहाटे तीन पासून आणखी मुसळधार पाऊस सुरूच राहिल्याने तालुक्यात ४२ मीमी ची नोंद झाली आहे.
तर मंडलनिहाय पाऊस खालीलप्रमाणे. माजलगांव ४८ मीमी,गंगामसला ६० मीमी,दिंदृड २२ मीमी,नित्रुड २२ मीमी,तालखेड ५५ मीमी,किट्टी आडगाव ४५ मीमी अशी पावसाची नोंद झाली. या पावसाने शेतकरी नवीन पिकाची लागवड करण्यासाठी व्यस्त झाल्याचे चित्र आहे.
माजलगाव तालुक्यातील टाकरवण ,सादोळा परिसरात मोठा पाऊस झाल्याने येथील बंधाऱ्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तर माजलगांव धरणात पाणी साठ्यात देखील वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या खरीप हंगामात पावसाने हजेरी देऊन दडी दिल्याने शेतकरी मोठा चिंताग्रस्त झाला होता परंतु यावर्षी पुन्हा नव्या जोमाने शेतकरी वर्गाने शेतकामे पूर्ण करून मृग नक्षत्रात पेरणीसाठी सज्ज झाला आणि त्याला पावसाने देखील साथ देऊन पेरणीसाठी मार्ग मोकळा केल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});