माजलगांव, प्रतिनिधी – कोरोणा या जागतिक महामारीने सध्या सर्वांचे जनजीवन विस्कळित केले आहे.त्यातच नगर परिषद मधील जे अस्थायी सफाई कामगार आहेत त्यांना देखील याचा चटका बसत आहे.
ही बाब लक्षात घेऊन येथील व्यापारी महासंघाने माजलगांव न.प. चे मुख्य अधिकारी भागवत बिघोत साहेब व ओ.एस.गणेश डोंगरे साहेब यांच्याशी चर्चा करून ७० कुंटुंबाला एक महिना पुरेल अश्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये धनराज बंब,संतोष अब्बड,गोविंद बजाज व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी यांनी प्रत्येकी २०,२०,२० व १०कुटुंबांना ही मदत व्यापारी महासंघाच्या माध्यमातून केली आहे.या आगोदर ही तहसील कार्यालयातुन ग्रामीण भागातील ६५जनांना मिळुन ७२,००० रूपये किराणा साहित्य वारुळा व मालीपारगाव येथील शेतमजूर व उसतोड कामगारांना तहसीलदार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते.