मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा च्या वतीने माजलगांव येथे अखिल भारतीय निषेध दिन पाळण्यात आले

माजलगांव, प्रतिनिधी :- देशात आधीच बेरोजगारीने विक्राळ रूप धारण केले होते; त्यात लॉकडाऊनने १५ कोटी कामगारांना बेरोजगार केले आहे. देशातला मोठा जनविभाग उपजीविकेच्या साधनांपासून पूर्णतः वंचित झाला आहे. आपल्या घरांकडे पायी चालत जात असलेल्या मजुरांची काळीज फाडणारी उपासमार पाहून जनतेची काय अन्नान्नदशा झाली आहे, हे दिसत आहे.

जनतेवर अशी दारूण परिस्थिती लादणाऱ्या सरकारचा आज माजलगांव येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आले व यावेळी इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख दिले पाहिजेत. सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे. मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे.

शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा. बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा. राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या या मागण्या करण्यात आले, यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ.बाबा सर, सय्यद याकुब, शेख मेहबूब, रूपेश चव्हाण, सादेक पठाण, शेख समीर, सय्यद फारुख, सय्यद समीर, शेख आसेफ, सय्यद आलताफ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी करा सोयाबीन पिकाची लागवड

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedबीडमाजलगांव
Comments (0)
Add Comment