मालवण,दि 02 (प्रतिनिधी)ः “गाव तेथे किसान मोर्चा “ही संकल्पना घेऊन पंचक्रोशीतील शेतकरी व महिला बचत गट यांनी उत्पादीत केलेल्या कृषी मालाला योग्य बाजारपेठ व बाजार भाव मिळावा,शेतकरी वर्गाला चालना मिळावी,योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणुन खोटले,मालवण येथे सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ७फेब्रुवारी २०२१रोजी सकाळी १०वाजता’सुहासिनी परब हायस्कूल’येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेस भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष राजन तेली,भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित रहाणार आहेत. या शेतकरी परिषदेस महिला बचत गट,शेतकरी,कृषी उद्योजक यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी केले आहे.