मुंबई/पुणे,दि 22 (प्रतिनिधी)ः
बाजारात मागणी वाढल्यानं कांद्याच्या दराने पुन्हा उसळी मारली आहे. मुंबई आणि पुण्यात कांद्याचा भाव प्रति किलो १०० इतका झाला आहे. पुरवठ्यात कमतरता होत असल्यानं कांद्याचे भाव वाढली आहेत.
कांद्याची मागणी बाजारात वाढली आहे आणि पुरवठा कमी झाला आहे त्यामुळे कांद्याचे दर कडाडले आहेत. पुणे एपीएमसीत कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या विलास भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास ६० टक्के कांद्याचं उत्पादन हे नाशिकजवळच्या लासलगावमध्ये होतं. सध्या बाजारात कांद्याला जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठा होत नाहीये. पुरवठ्यात कमतरता होत असल्याने कांद्याचे दर कडाडले आहेत.
फक्त किरकोळ बाजारातच नाही तर घाऊक बाजारातही कांद्याचे दर कडाडले आहे. क्विंटलचा दर जानेवारीत १९०० रुपये होता जो आता ६ हजारांच्या पुढे गेला आहे असंही कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळे कांद्याची बाजारांमधली आवक घटली आहे. असं असलं तरीही कांद्याची मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत.सध्या कांद्याची मागणी घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये चांगलीच वाढली आहे. अशात पुरवठा मात्र कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव चांगलेच कडाडले आहेत. बुधवारी मुंबईत कांदा ८० ते १०० रुपये प्रति किलो तर पुण्यात १०० ते १२० रुपये किलोच्या दराने विकला गेला…मागच्या आठवड्यात कांद्याचे दर ७० ते ८० रुपये किलो होते. या आठवड्यात मात्र कांद्याचे दर चांगलेच कडाडल्याचं दिसून येतं आहे.पुणे मार्केट यार्डात २१ ऑक्टोबरला ४० ते ५० ट्रक कांद्याची आवक झाली आहे. आवक सध्या कमी असली तरी कांद्याला मागणी अधिक आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नवीन कांद्याचा हंगामही लांबला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मंगळवारी कांद्याचे दर वाढले आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कांदा उपलब्ध होत असला तरी पावसामुळे जुना कांदा काही प्रमाणात खराब झाला आहे. तर, नवीन कांद्याचे पीक वाया गेल्यासारखेच आहे. त्यात नवीन कांदा हातात जो आला आहे त्याची प्रत खराब आहे.