मुख्यमंञी ऊद्धव ठाकरे होणार “आमदार”

विधानपरिषदेच्या ९ जागासाठी लागणार निवडणूक

पुणे, सदाशिव पोरे – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या २४ एप्रिलला मुदत संपलेल्या ९ जागांची निवडणूक लवकरच होणार असल्याची माहिती समोर आलीय. दि. १ मे रोजी शुक्रवारी झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या मंञीमंडळ बैठकीत शिवसेना,काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याविषयी विनंती केली होती. ही निवडणुक २७ मे पुर्वी मुंबईत होणार असुन महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेले सदस्य या जागासाठी मतदान करतील. कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने निवडणूक लांबणीवर पडली होती. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला पायबंद घालण्यासाठी काही अटी व नियम घालुन ही निवडणूक पार पडेल. निवडणूकीचे वेळापञक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळालीय. ही निवडणूक मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची आहे कारण ते विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सहा महिन्याच्या आत विधीमंडळाचं सदस्य होणं बंधनकारक असेल अन्यथा महाराष्ट्र सरकार अस्थिर होईल.
या बाबतीत मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याची समोर आलयं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी ३ सदस्य, शिवसेना व काँग्रेस यांचा १-१ सदस्य यांचा कार्यकाळ २४ एप्रिलला संपुष्टात आला असुन एका सदस्याची मुदत अगोदरच संपलेली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाने ४ जागांची मागणी केल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, आनंद ठाकुर, किरण पावसकर, काँग्रेसचे हरिसिंग राठोड, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपच्या अरुणभाऊ अडसड, पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ यांचा कार्यकाल संपला असुन यांना पुन्हा संधी मिळणार की नवीन चेहरे समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार का??

१९ जुलै २०२० ला राज्यातील काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत संपणार असुन यामध्ये पुणे, औरंगाबाद, नागपुर यांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या सतिश चव्हाण, भाजपच्या अनिल सोले तर अपक्ष श्रीकांत देशपांडे, दत्ताञय सावंत यांचा कार्यकाल संपतोय. याच दरम्यान राज्यपाल नियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४, काँग्रेसच्या ५ तर पीपल्स रिपब्लिक पक्षाच्या एका जागेचा समावेश आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यामध्ये प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे, डॉ. हुस्नबानु खलिफे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदुरकर, राघोजी पाटील, रामहरी रुपनवर, जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे.

Comments (0)
Add Comment