धर्माबाद : धर्माबाद नगर परिषद कार्यालयाचे शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी शहरातील विविध वार्डात प्रत्यक्षात भेट देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन कार्यालयीन कर्मचा-यांना आवश्यक त्या सूचना देत नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधांसाठी अडचण येणार नाही असे अभिवचन दिले.
शहरातील विविध वार्डाची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले -सफाई व्यवस्थित झाली की नाही,प्रत्येक वार्डात पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत की नाही याबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील त्यांनी ऐकून घेतल्या.
लॉकडाउन काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी मंगेश देवरे व त्यांच्या सर्व सहका-यांनी विशेष परिश्रम घेतल्याने धर्माबाद शहर अद्यापही कोरोनामुक्त आहे हे विशेष.
धर्माबाद शहरात मधोमध भाजीपाला बाजार भरत असल्याने मोठी गर्दी होत असे नगर परिषद ने ठराव घेऊन बाळापूर हद्दीत स्वतंत्र भाजीपाला बाजार सुरू करण्यासाठी आदेश काढले पण मागिल 20 वर्षातील एकाही मुख्याधिका-यांनी हा बाजार नियोजित जागेवर हलविण्याबाबत धाडस केले नाही मात्र विद्यमान मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी हा बाजार आठवड्यापूर्वीच नियोजित जागेवर स्थलांतर करून शहरातील गर्दी कमी केली आहे कर्तव्यदक्ष व नागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणारे मुख्याधिकारी म्हणून मंगेश देवरे यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});