मुर्डेश्वर महादेव मंदिर श्रावण महिन्यात राहणार बंद

सिल्लोड-औरंगाबाद, प्रतिनिधी  – सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील जगप्रसिद्ध मुर्डेश्वर महादेव मंदीर या वर्षी श्रावण महिन्यात बंद राहणार. केळगाव येथील मुर्डेश्वर येथे दर्शनासाठी श्रावण महिन्यात अलोट गर्दी होत असते. या ठिकाणी दर श्रावण सोमवारी यात्रेचे स्वरूप येते. अनेक गावांगावाचे भंडारे कथा कीर्तन व राजकारणातील विविध नेत्यांचे प्रत्येक श्रावण सोमवारी अन्न दान अनेक दिग्ज नेत्यांच्या दर्शना निम्मत भेटी परंतु या वर्षी या सगळ्या गोष्टी पासून कोरोणा मुळे सर्वच वंचित राहणार असल्याचे दिसत आहे.

मुर्डेश्वर मंदिर हे केळगाव परिसरात आहे व केळगाव मध्ये कोरोणा रुग्ण आढळल्याने केळगाव सह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.करिता गाव बंद करण्यात आले आहे. मंदिर परिसरात कुठलेही धार्मिक कार्यक्रम होणार नाही व मंदिर श्रावण महिन्यात बंदच राहील परिसरातील तसेच बाहेरून येणाऱ्या भक्तांनी मुर्डेश्वरला येवू नये असे संस्थानचे पीठाधीश श्री ओमकारगिरी महाराज यांनी सांगितले आहे.

‘डिजीटल स्त्री शक्ती’ : 5000 तरुणी होणार ‘सायबर सखी’

aurangabadsillod
Comments (0)
Add Comment