मोहता गिरणी टाळेबंदीप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे दालनात बैठक

आमदार कुणावारांची गिरणी सुरु करण्याची मागणी

हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – शहरातील मोहता गिरणी व्यवस्थापणाने विनानोटिस टाळेबंदी घोषित करुन कामगारांचे ३ महिन्याचे वेतनसुद्धा दिले नाही,कामगारांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय न दिल्याने ही गैरकायदेशीर टाळेबंदी तात्काळ मागे घेण्याची जोरदार मागणी आमदार समिर कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे बैठकीदरम्यान केली.

शहरातील मोहता व्यवस्थापणाने बंद केलेली गिरणी पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात यावी,यासाठी आज हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे प्रयत्नाने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आज दि.१५ रोजी आयोजित बैठकीत सरकारी कामगार अधिकारी,कामगार प्रतिनिधी,इंटुकचे सरचिटणीस आफताबखान,माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, मिल कामगार प्रतिनिधी यांनी भाग घेतला.

शहरातील मोहता गिरणीचे व्यवस्थापणाने कोरोनाकाळातील संचारबंदीचा फायदा घेऊन मिलमधे टाळेबंदी घोषित केल्याने शेकड़ो कामगार निराधार झाले आहेत,त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून सदर गिरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्वरित सुरु करावी अशी मागणी आमदार कुणावार यांनी केली.

व्यवस्थापणाने कामगारांना ३ महीण्यापासून वेतन दिले नाही, त्यांचे कोणतेही देणेसुद्धा दिले नाही,या कामगारांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्यायसुद्धा न देता बेकायदेशीर टाळेबंदी जाहिर केली.

आमदार समिर कुणावार यांनी यापुर्वी दोन वेळा सदर प्रकरणी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची भेट घेतली होती. आज झालेल्या बैठकीत मोहता गिरणी व्यवस्थापणाचे प्रतिनिधी गैरहाजर असल्याने जिल्हाधिकारी यांनी लेबर ऑफिसर यांच्याशी चर्चा करून पुढील बुधवारी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

Comments (0)
Add Comment