यमाई देवी मंदिर परिसरात न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षारोपण

 

राजगुरूनगर,दि 27 ः श्री यमाई देवी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कनेरसर व खेड वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री यमाई देवी मंदिर परिसरात खेड न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश तथा यमाई देवी देवस्थानचे अध्यक्ष डी बी पतंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या परिसरात आज (दि.२६) रोजी श्री यमाई देवी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कनेरसर व खेड वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिंच, आवळा, बाबू, बेल, बदाम, अशोका सह शोभेच्या वृक्षांची ८१ रोपे लावण्यात आली. खेड कोर्टाचे सह दिवाणी न्यायाधीश तथा श्री यमाई देवस्थानचे अध्यक्ष डी बी पतंगे, सचिव तथा पुणे धर्मादाय आयुक्त विभागाच्या निरीक्षक रागिणी खडके, वनविभागाचे अधिकारी एस एन पाटोळे, दत्तात्रय फापाळे, आर ए गोकुळे, कनेरसर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता केदारी, उपसरपंच मछिंद्र वाघ, पोलीस पाटील विठ्ठल पवार, पी बी शिंदे, एस आर राठोड, खेड कोर्टाचे विठ्ठल राऊत यांच्यासह वनविभाग व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते

Comments (0)
Add Comment