नसरापूर,दि 19 (प्रतिनिधी) ः
राजगड पोलिसांनी सारोळा ता. भोर येथे 5 लाखाची गावठी अवैध हातभट्टी दारू जप्त करून आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करत कारवाई केली असल्याची माहिती राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना अवैध दारू वाहतूक बाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने रात्रगस्त पेट्रोलिंग अधिकारी सहा पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे व पोलीस स्टाफ यांनी सारोळा गावचे हददीत सारोळा विर रोडने सारोळा बस स्टॉप जवळ रात्री 02:30 वा चे सुमारास येणारे एक संशयीत महीद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच १२ आर एन ९७४३ थांबवून वाहनाची तपासणी केली असता हौदया मधे काळे रंगाचे ताडपत्री खाली प्लॉस्टीकचे काळे व निळे रंगाचे 35 लिटर मापाचे एकूण 40 कॅड गावठी हातभटटी दारू ने भरलेल्या अवस्थेत मिळुन आले. सदर पीकअप गाडी व मालाची पाहणी केली असता त्यामध्ये १,४०,०००/रु किंमतीचे प्लॅस्टीकचे काळे व निळे रंगांची ३५ लीटर मापाची ४० कॅड अशी एकुण १ हजार ४०० लीटर गावठी हातभटीची तयार दारू किंमत अंदाजे ३,५०,००० / रु एक पांढरे रंगाची महींद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच १२ / आर एन / ९७४३ असा एकूण ४,९०,०००/ किमंत रू.चा प्रोव्ही माल मिळुन आल्याने इसम नामे १) राजु लक्ष्मण जानकर वय २२ वर्षे धंदा डायव्हर रा. चील्हेवाडी ता पुरदंर जि पुणे २) महेंद्र राजेंद्र कुंभार वय ३१ धंदा खाजगी व्यावसाय रा शिरवळ शेखमेरवाडी ता खंडाळा जि सातारा ३) बाप्पु धोंडीबा कोकरे वय ३२ धंदा मजुरी रा कांबरे ता भोर जि पुणे असे विनापरवाना अवैद्य गावठी हातभट्टीची दारू वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहा. फौज. कदम, पोलीस हवालदार शिरसाठ व पोलीस शिपाई राजीवडे यांनी केलेली असून पुढील अधिक तपास पोलीस हवालदार शिरसाठ हे करत आहेत.