माजलगांव,प्रतिनिधी :-रिक्त झालेल्या माजलगांव नगरपरिषद नगराध्यक्षाच्या पदावर आपल्या पक्षाचा नगरसेवक नगराध्यक्ष करण्याची संधी आली असताना आ.प्रकाश सोळंके यांनी भाजपची सत्ता आणली आहे . त्यामुळे पालिकेत राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक असूनही पुन्हा भाजपचाच थाट निर्माण झाला आहे.या निर्णयाने राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांत नाराजी पसरली असून आ.सोळंके यांचे वाढते भाजप प्रेम राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना पचणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केल्या जात आहे.
पालिकेची सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी गेल्या चार महिन्यात आ . प्रकाश सोळंके यांनी राजकारणाचा कडेलोट केला.तो फक्त सत्ता काबीज करण्यासाठी नगराध्यक्षांच्या अवि श्वासापासून तर पालिकेच्या बरखास्ती पर्यंतच्या सर्व खेळी खेळून नगराध्यक्ष पद रिक्त करण्याची योजना ही त्यांनी आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाच्या जोरावर यशस्वी करून दाखवली.या घटनाक्रमात राष्ट्रवादिच्या नगर सेवकांनापालिकेत आपली सत्ता येईल ही अपेक्षा होती.
परंतु झाले उलटेच , प्रशासनाने ज्यावेळेस माजलगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद रिक्त केले त्यावेळेस आमदार सोळंके यांना उपनगराध्यक्ष असलेल्या सौ सुमन मुंडे यांच्या विरोधात अविश्वास दाखल करून आपल्या पक्षाच्या सक्षम नगर सेवकास संधी देण्याची गरज होती . परंतु आ . प्रकाश सोळंके यांनी भाजपाच्या असणाऱ्या सौ सुमन मुंडे यांना रिक्त असलेल्या नगराध्यक्षा च्या पदावर विराजमान होण्याची संधी दिली .
नियमानुसार रिक्त पदाचा कारभार उपनगराध्यक्ष पाहण्याचे संकेत असली तरी पदभार समारंभात आमदार सोळंके यांचे पुढाकार स्वरूपी मिरवणे त्यांचे वाढते भाजप प्रेम स्पष्ट करत आहे.हे प्रेम महाविकास आघाडी शासनाने त्यांना मंत्रीपद नाकारल्या पासून वाढत असल्याची चर्चा आहे . माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पार पडले ल्या विधानसभेत त्यांचे सहकार्य झाल्याची कुजबुज होती.त्या मोबदल्यात त्यांनी आपला मतदार संघ सोपा करून घेतला असल्याचे राजकीय जाणकार बोलून दाखवतात . या छुप्या युतीला मंगळवार रोजी नगराध्यक्षपदाच्या पदभार समारंभात उघड स्वरूप मिळाले.सर्वात जास्त नगरसेवक राष्ट्रवादीचे असूनही भाजपाचा उपनगराध्यक्ष पुन्हा नगराध्यक्ष करणे.म्हणजे तालुक्यातील राष्ट्रवादी गारद करण्याचे कारस्थान असून यातून भाजपची ताकत वाढवण्याची गुप्त खेळी असल्याचे बोलल्या जात आहे .
पालिकेत प्रशासक नेमण्याच्या भूमिकेत घुमजाव का ?
जवळ पास सर्वच नगरसेवकांना नालायक म्हणणाऱ्या आ.प्रकाश सोळंके यांनी शहराच्या विकासासाठी पालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची भूमिका घेऊन प्रशासनाकडे मागणी केली होती.परंतु ज्यांना नालायक म्हणून डिलीट केला त्या बॉडीतिलच एकाला नगराध्यक्षपदाचा पदभार देऊन त्या समारंभात पुढारी पणात मिरवणाऱ्या आ.सोळंके यांचा पालिकेत प्रशासक नेमण्याच्या भूमिकेतील घुमजाव पणा दिसून येत आहे .
आदिवासी भागातील रानभाज्या वाढवतायेत रोगप्रतिकार शक्ती
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});