रुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छतारुग्णालयांना ऑक्सिजनरेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापरसुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. माझे कुटुंबमाझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावीअसे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना विचारात घेवून त्यानुसार योग्य कार्यवाही करावीअसे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

             ‘कोविड व्यवस्थापनाबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आलीराज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हेखा. सुप्रिया सुळे, (व्हिसीव्दारे)पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळपिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेखासदार गिरीष बापटखासदार डॉ.अमोल कोल्हेआमदार चेतन तुपेआमदार माधुरी मिसाळआमदार सुनील कांबळेआमदार अतुल बेनकेआमदार सिद्धार्थ शिराळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ रावससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगमपुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमारपिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकरजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखपुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस आयुक्त कृष्णप्रकाशजिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुखआरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखेससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवारजिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारीपदाधिकारी उपस्थित होते.

             उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी शासनप्रशासन व जनतेच्या सहकार्यातून कोरोनासंकटावर  मात करणे शक्य आहेअसा विश्वास व्यक्त केला. रुग्णालयांमध्ये स्वच्छता असावीऑक्सिजनरेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरवठा सुरळीत रहावाअत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावीगरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यातयाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीकोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ मोहिमेला गती देण्यासोबतच बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी नियोजन कराअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

           विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी माझे कुटुंबमाझी जबाबदारी मोहिमे  अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ.सुभाष साळुंखे म्हणाले14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पहिल्या पुण्याचा निर्धारकोरोना हद्दपार अभियान राबविण्यात येत आहे.पुणे महानगरपालिकापिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

Comments (0)
Add Comment