पुणे,प्रतिनिधी – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संकटांच्या काळात पुण्यातील रेड लाईट भागातील महिलांना युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी शहर सचिव सुदर्शन चखाले यांच्या मार्गदर्शना खाली ५०० रेशन कीट आणि जीवनोपयोगी साहित्याची मदत केली.
या भागातील स्थानिकांचे जगण्या मरण्याचे प्रश्न भयंकर आहेत. लॉकडाऊन असल्याने या लोकांचे अन्नधान्याच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत.उपासमारीचे दिवस या महिलांवर आलेले आहेत.त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
या महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रेशन कीट युक्रांद संघटनेने उपलब्ध करून दिले. हे किट त्यांनी जॉन पॉल फौंडेशन या स्थानिक संस्थेच्या माध्यमातून या भागातील महिलांपर्यंत पोहचवले.तर जॉनपॉल या संस्थाने या भागात रक्तदाब ,मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधे पुरवली असंही चखाले यांनी सांगितले .
या कामात संदीप बर्वे, कार्यवाह, युक्रांद, जाबवंत मनोहर ,राज्यसंघटक, युक्रांद, नागेश गायकवाड आणि जॉन पॉल फौंडेशन संस्थेच्या धनश्री जगताप याचं मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले.
SBI बँकेच्या ग्राहकांची अवस्था – भीक नको पण कुत्रं आवर अशी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});