नागरिकांत भितीचे वातावरण
मनमाड, प्रतिनिधी – कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आयसोलेशन रेल्वे रॅक बनविविलेला असून हा रॅक मनमाड रेल्वे स्टेशन येथे ठेवण्यात येणार आहे.असल्याची माहिती वार्यांसारखी पसर्यानंतर मनमाडकर नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून हा रेल्वे रॅक येथे उभा करू नये यासाठी जोरदार हालचाली करून रेल्वे मंत्रालय,खासदार,आमदार यांच्यापर्यंत शेकडो नागरिकांनी पत्रव्यवहार करून विरोध दर्शविला आहे.त्यामुळे कालपासून हा चर्चेचा विषय ठरला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
याबाबत येथील व्यापारी वर्गाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनमाड रेल्वे स्टेशन हे मानमाडच्या मध्यवर्ती ठिकाणी भर वस्तीत आहे व आयसोलेशन केलेल्या रुग्णांना जर येथे ठेवण्यात आले तर डॉ.आरोग्य कर्मचारी,रुगणाचे नातेवाईक या सर्वांची वर्दळ राहील व त्यामुळे मनमाड तसेच नांदगाव तालुका कोरोना पासून खूप लांब आहे. आज पावेतो एकही रुग्ण येथे नाही व याचे सर्व श्रेय येथील स्थानिक प्रशासन,नागरिक,म्युनिसिपल कर्मचारी,पोलीस कर्मचारी,आरोग्य कर्मचारी व मनमाड मधील सर्व डॉ व सेवाभावी संस्था यांना जात असून त्यांनी दिवस रात्र मेहेनत घेऊन कोरोनाला शिरकाव करू दिला नाही.मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात दाट लोकसंख्या व स्टेशन लगत झोपडी पट्टी असल्याकारणाने धारावी सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये असे झाल्यास परिस्थिती आवाक्या बाहेर जाईल व नंतर आटोक्यात आणणे कठीण होईल व कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढेल ज्या भागात एकही रुग्ण नाही.तेथील परिस्थिती बिघडण्यास हा निर्णय कारणीभूत ठरेल या करिता हा निर्णय घेतला असेल तर तो त्वरित रद्द करावा अशी मागणी केली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा