लेखणी बहाद्दरांनी गरीबाची भूक भागवली – पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने हिंगणगाव येथे जीवनोपयोगी वस्तूचे वाटप संपन्न

इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील लेखनि बहाद्दरांनी गरीब उपेक्षित कुटुंबांचा सर्वे करून,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून गरीबांची भूक भागवली आहे असे गौरवोद्गार वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व सी.वाय डी ए सामाजिक संस्था यांच्या वतीने गरीब,गरजू व शेतमजूर कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर,तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व हिंगणगाव चे पोलीस पाटील शरद पाटील यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे(बुधवार दि. २९ एप्रिल)रोजी वाटप करण्यात आले.

यावेळी सी.वाय डी ए संस्थेचे संचालक प्रवीण जाधव,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे,तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार,कार्यकारणी सदस्य भीमराव आरडे,दत्तात्रय गवळी,विजयराव शिंदे, शिवाजी पवार,शिवकुमार गुणवरे,निखिल कणसे,प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे,राजेंद्र भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीनराव आरडे,प्रकाश आरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुटेकर म्हणाले की,ज्या गरिबांना अन्नाची गरज आहे.मात्र घरात हाताला काम धंदा नसल्यामुळे जीवनोपयोगी वस्तू नाही,धान्य नाही अशा कुटुंबांना आधार देण्याची भूमिका पत्रकार संघाच्या माध्यमातून पार पडते आहे.त्यामुळे झोपडीतल्या उपेक्षित कुटुंबांना सामाजिक जाणिवेतून आधार प्राप्त झाला आहे अशीही माहिती पोलीस उपनिरीक्षक मुटेकर यांनी दिली.

Comments (0)
Add Comment