अंबरनाथ, जाफर वणू – अंबरनाथ शहरातील हनुमान नगर, फॉरेस्ट नाका या परिसरातील घरेलु कामगार महिला ह्या महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या सदस्या आहेत. अश्या महिलांना चार घरची धुणी-भांडीकरून आपला परिवारांचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्या मोलकरीण महिला सुमारे 200 हुन अधिक असून या कोरोनासारख्या संकट काळात निराधार झाल्या असल्याने असंघटीत महिला कामगारांची घरची परस्थिती पाहिल्यानंतर डोळयात अश्रु येण्यासारखे त्यांचे दुख आहे. या महिलांना घरकाम करण्यास सोसायटीमध्ये प्रवेश मिळत नाही. कारण आजुबाजुच्या मोठया गृहसंकुल पार्कमध्ये राहणारे कामगार मुंबईला जातात. असे कामगार कोरोना बाधीत सापडल्याने ते आपल्या पत्तात फॉरेस्ट नाका संगितल्याने या वस्तीमधील लोकांचा रोजगाराच प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु या ठिकाणी एकही कोरोना रूग्ण नसल्याची माहिती येथील घरकाम महिलांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थायी पत्ते जाहिर करावेत. अन्यथा या वस्तीचे नाव खराब होत असल्याचा आरोप भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील ह्यांनी केला आहे.
त्याचबरोबर कल्याण बदलापुर राज्यमार्गावरील फॉरेस्ट नाका येथील सुमारे 200 हुन अधिक घरेलु कामगार महिला या महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या सदस्या आहेत. परंतु त्यांची अद्याप नोंदणी झालेली नसल्याने कोरोनाच्या महामारीत घरकाम बंद झाल्याने गेल्या चार महिन्यापासुन यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना वेळेवर अत्यावश्यक रेशनिंग दुकानातून रासन सुद्धा वेळेवर मिळत नाही. अश्या अवस्थेत लाॅकडाउनच्या काळापासुन गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक विश्वजीत करंजुले-पाटील ह्यांच्यावतीने हनुमान नगर, फॉरेस्ट नाका या परिसरात प्रत्येक घरोघरी जाऊन धान्यवाटप, शिजवलेले अन्य, मास्क व वेळोवळी औषधेही पुरवली गेली. मात्र आता या असंघटीत घरकाम महिलांना सोसायटीमध्ये घरकामासाठी प्रवेश दिला जात नसल्याने या महिला कामगारांना हक्काचा रोजगार आणि ‘आपला दाम’ मिळालाच पाहिजे असा आक्रोश करत शासनाने घरकामगार महिलांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराचे पदाधिकारी व भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील यांच्याकड़े मांडल्या.
दरम्यान गेल्या 3 ते 4 महिन्यापासुन काम धंदा बंद नसल्याने शासनाकडुन कोणती प्रकारची मदत मिळाली नाही. आमच्याकड़े पैसा नसल्याने आमच्या घरात चुल पेटनार कशी? त्याच कारणाने आम्ही उपाशी पोटी पाण्यावर जगतोय. त्यात घरकाम महिलांना काम नसल्याने निराधार झाल्या आहेत. तसेच बऱ्याच मुलांना, पुरूषांना रोजगार नाही. तांदुळ मिळतात पण त्यासोबत काय खायच नुसता पांढरा भात? सरकारी धान्य वेळेवर मिळत नाही. आजारी पडल्यावर मुलाबाळांच्या औषधासाठी पैसे कुठुन आणायचा? बहुतांश वस्तीमधील कुटुंबाचा उदरनिर्वाह घरेलु महिला कामगारांच्या रोजगारावर चालत असल्याची गंभीर व्यथा महाराष्ट्र् राज्य घरकामगार युनियनच्या सदस्या आशा गायकवाड, हसुलोचना म्हस्के, जुलेखा शेख, आदी सुमारे दोनशे घरेलु महिला कामगारांनी भाजपा पदाधिकारां समोर मांडल्या, यावेळी चक्क सहावीत शिकणाऱ्या मुलीने सांगितले की, माइया आईला घरेलु रोजगार मिळत नाही, ती मला महागडा मोबाईल घेवुन देवु शकत नाही. मग आम्ही आॅनलाईन शिक्षण कस घ्यायचं असा डोळयात अंजन घालणारा प्रतिसवाल शासनाला केला आहे.
याप्रसंगी हनुमान नगर, फॉरेस्ट नाका या परिसरातील ज्या-ज्या घरेलु कामगार महिलांना कामाची गरज आहे अश्या कामगार महिलांनी भाजपाकडे नाव नोंदणी करावी. नंतर पहिल्या टप्प्यात 50 -60 महिलांना साधारण 15 हजार पगाराची रोजगार व्यवस्था करू शकतो असा विश्वास भाजप नेेते गुलाबराव करंजुले पाटील ह्यांनी दिला. तेव्हा येथील घर कामगार महिलांनी दिलासादायक समाधान व्यक्त केेले. या लॉकडाऊन काळापासून मदतीचा हात पुढे करणारे म्हणजे समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकारांनी दिला आहे. सदरवेळेस भाजपचे दिलीप कणसे, विश्वास निंबाळकर, डॉ.आशिष पावस्कर, संतोष शिंदे, श्रीकांत रेड्डी, संतोष वंदाल, समाजसेवक अब्दुल सत्तार वणू ह्यांच्यासह परिसरातील नागरिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.