माजलगांव, प्रतिनिधी – कोरोना संकटामुळे संपूर्ण देश लॉकडावून करण्यात आला ही विषाणू संसर्ग रोखण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे मात्र या लॉकडाऊनमुळे छोटे मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यात प्रामुख्याने लग्न समारंभ बंद असल्याने वरातीसाठी लागणारा घोडाही दवणीलाच आहे. यामुळे आपण खायचे की घोड्याला जगावायचे असा प्रश्न घोडा मालकांना पडला आहे. कमाई नसल्याने या व्यावसायिकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.
लग्न समारंभ म्हणजे सर्व व्यावसायिकांची चांदी! लग्न दोन कुटंबाचे असते मात्र सर्व लोकांना चार पैसे कमाईचे हे सिजन असते यात मंडप, किराणा दुकानदार, आचारी स्वयंपाकी, बाजावाले, कपडा व्यापारी, पत्रिका छपाई, रुखवत, मळवट, हारतुरे वाले, मेकअप, फोटोवाले, भटजी, वाहन, डीजेवाले , धाबे हॉटेल पासून ते वरातीत लागणारा ‘घोडा’ ही सर्व मंडळी लग्न सराईची आतुरतेने वाट पाहत असते. करण जो व्यवसाय त्यांनी सुरू केलेला असतो तो कोणाचे कोणाचे कर्ज काढून किंवा हात उसने पैसे घेऊनच त्या प्रत्येकाला आपल्याकडील उसने पैसे देण्यासाठी लग्नसराई हा उत्तम आणि खात्रीचा पर्याय असतो ! पण या वर्षी आपले दुर्दैव ! संपूर्ण जगाला केविड १९ कोरोना या महमारीने जखडून ठेवले आहे लाखो निरपराध लोकांचे बळी घेणारा कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. सर्वांचे जीवन ठप्प झाले आहे. भारतातही तीच परिस्थिती आहे. पण आपण वेळीच दखल घेऊन भारत लॉक डाऊन केला आणि काही प्रमाणात हा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात का होईना इतर देशांच्या तुलनेत यशस्वी झालो आहोत. संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यात महाराष्ट्रावरही या बंदीचा आर्थिक परिणाम जाणवत आहे. येथील कारखानदारी, उद्योगधंदे, शेती व्यवसाय हे पूर्ण बंद असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. या मोठं मोठ्या व्यवसायाबरोबरच लहान व खाजगी व्यवसाय ही पूर्णपणे बंदच! मग ज्यांचा उदरनिर्वाह याच कामावर चालतो त्यांचे काय ? हा प्रश्न उपस्थित होतो. लॉक डाऊन आणि जमावबंदी यामुळे या वर्षी होणारी लग्न समारंभ ही बंद आहेत. लगीन घाई थांबली अन् अनेकांचे धंदे ही थांबले ! लग्नात अत्यंत प्रतिष्ठित असलेली वरात ही तर तरुणाई व मित्रांसाठी मेजवानी असते त्यात वरात ही घोड्यावरून म्हटल्यावर बघायचेच नको. हा वरातीचा घोड्याला चांगली मागणी असल्याने काही तरुण या व्यवसायात उतरले आहेत माजलगांव तालुक्यातील तालखेड येथील सय्यद परवेज या तरुणाने कर्ज काढून १ लाख रुपयांचा मोठा काठवडी घोडा मागच्या तीन महिन्यापूर्वी आनून आपली उपजीविका भागेल असा त्याचा समाज पण या सर्व गोष्टी वर कोरोनाचे संकट आले आणि सर्व संपलं ? एक ते दीड महिन्यापासून देशात लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे लग्न सराई बंद आहे अश्या परिस्थितीत तो घोडा आणि आपला प्रपंच कसा भागवयाचा असा ज्वलंत प्रश्न या तरुणा पडला आहे. त्यात धोंड्याचा खुराक जवळपास तीनशे ते चारशे रुपय हे कोठून आणायचे आन लोकांचे घोड्यासाठी आणलेले पैसे कसे द्यायचे असा सवाल सय्यद परवेज याने केला. इथं खायचे वांदे आहे आज आमचा व्यवसाय बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आहे साहेब ! असं ही या तरुणाने बोलताना सांगितले.