ग्रा. पं. पाच टक्के निधी वाटपास दाखवत आहे रेड सिग्नल
माजलगांव, धनंजय माने – कोरोना व्हायरस या रोगाने जगभर थैमान घातल्याने संपूर्ण जग आज या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. यामध्ये आपला देश देखिल आडकला आसुन कोरोना व्हायरस विष्णुचा प्रसार सर्वात जास्त वेगाने होत आसल्याने महाराष्ट्र राज्यात या रोगाचे सर्वाधीक रूग्ण आसल्याचे पाहण्यास मिळत आहे. हा रोग आटोक्यात आणण्या करता महाराष्ट्र राज्या सह देश लॉकडॉऊन करण्या करता महत्वाचे पाऊल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचले व गत एक महीन्या पासुन सपुर्ण देश लॉकडॉऊन करण्यात आला यामुळे सर्वच व्यवाहार, हाताला मिळणारे रोजची कामे बंद झाल्याने शेतकरी, शेतमजुर, ऊस तोड कामगारा सह सर्व कामगार मजुराना उपासमारी सारख्या समस्याला सामोरे जावे लागत आहे.
कसे तरी हातपाय हालवुन व सामाजिक संघटनेच्या मदतीमुळे पोट भरण्या करता सर्वच जन धडपड आसल्याचे चीत्र आज दिसत आहे. यांचा सर्वात मोठा फटका हा दिव्यांग व्यक्ती बसत आसल्याचे दिसत आसल्यामुळे उपास मारी सारख्या समस्याला त्यांना सामोरे जावे लागत आहे. एक महीन्या पासुन लॉकडॉऊन कायम आसल्यामुळे जवळ आसलेले आन्न धान्या सह जिवानवश्य वस्तु सपंत आल्यामुळे हे मिळवण्या करता दिव्यांग व्यक्ती समोर आडचणीचा डोगर उभा रहात चालला आहे. आशा काळात सामाजिक न्यायमंत्री यांनी दिव्यांगा साठी जाहीर केलेल्या किट आद्यापही घरपोहच मिळाल्या नाही त्यातच गावातील ग्रामपंचायला मिळणाऱ्या वर्ष भरातील कर वसुली सह चौद्या वित्त आयोगाच्या निधीतुन पाच टक्के निधी खर्च करण्याचे आदेश आसतानाही आद्यापही कुठच्या माजलगांव तालुक्यातील ग्रामपंचायकडुन निधी वाठप करण्यात आला नसल्यामुळे कोरोना सारख्या रोगाच्या कठीण काळात विविध समस्याणा दिव्यागाना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायकडुन दिव्यांग व्यक्तीला लवकरात लवकर पाच टक्के निधी वाटप करण्याकरता पावले उचणार आहोत.
– एस एल भारती ग्रामसेवक, टाकरवण
लॉकडॉऊन मुळे सध्या विविध समस्याना सामोरे जावे लागत आहे. दिव्यांगाच्या हाक्काचा आसलेला निधीही आद्यपही मिळाला नाही. आशा काळात मिळाला तर खुप चांगले होईल.
– विलास लव्हाळे, दिव्यांग व्यक्ती, टाकरवण
माजलगांव तालुक्यातील एकाही ग्रामपंचायत कडुन १७ कॉलम मध्ये दिव्याग यांच्या नोदी केल्या नाहीत. याला जबाबदार गटविकास आधिकारी आसुन ग्रामसेवक यांना पाठीशि घालण्याचे काम करत आहेत.
– डी.एच. गाडेकर, प्रहार दिव्यांग क्राती संघटना अध्यक्ष, माजलगांव