कमाईच्या काळात दुकाने बंद
माजलगांव, धनंजय माने – कोरोना व्हायरस रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे संपुर्ण देश एक महीन्या पासुन लॉकडॉऊन आसल्याने याचा सर्वात जास्त फटका हातावर मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या नागरिका बरोबर ग्रामीण व शहरी भागातील शिलाईमशिन चालकाना बसला आहे . यामुळे शिलाईमशिन चालक आडचीत आली आहेत . सध्या फ्याशनच्या जमान्यात रेडीमेट कपडे घेण्या कडे जरी सर्वात जास्त नागरिकाचा कल आसला तरी मात्र आजही ग्रामीण भागातील खुप मोठ्या संख्येने नागरिक शिलाई मशिनवर शिवलेले कपडे घालणे पसंद करतात.
शिलाईमशिन चालकाचे महत्वाचे दोन सिजन आसतात ते म्हणजे दिवाळी व लग्नसराई कारण या काळात महीना महीना नागरिकाना कपडे शिऊन घेण्याकरता वाट पाहवी लागत आसते कारण या दिवसात कपडी शिऊन घेणाऱ्याची संख्या जास्त आसते.
सध्या दुसऱ्या टप्यातील महत्वाचे सिजन शिलाईमशिन चालकाचे चालु झाले होते ते म्हणजे लग्न सराई पंरतु कोरोना व्हायरस रोगामुळे या सिजन वर पाणी फिरल्या गत झाले आहे कारण हा रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होत आसल्यामुळे याला रोकण्या करता एक मेव पर्याय म्हणजे लॉकडॉऊन आसल्याने गेल्या एक महीन्या पासुन संपुर्ण देश लॉकडॉऊन आसल्याने कमाईच्याकाळात दुकाने बंद ठेवावी लागत आसल्यामुळे शिलाईमशिन चालकाना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सध्या लग्नसराईचे महत्वाचे सिजन आहे मात्र कोरोनामुळे लॉकडॉऊन आसल्याने या कमाईच्याकाळात आम्हच्या व्यसायला मोठा आर्थीक फटका बसला आहे.
-पाडुंरग मुळे , शिलाईमशिन चालक.
कोरोना व्हायरस मुळे संपुर्ण देश लॉक डॉऊन आहे. यामुळे आम्हाला देखिल आम्हचे दुकाने बंद करावी लागली आहेत. शिलाईमशिनच्या कामावर आठ ते दहा जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला असुण त्यावरच त्यांचे घर चालते पन लॉकडॉऊन मुळे घर चालवने देखिल कठीण बनत चालले आहे.
-श्रीटेलर्स गोपाळ जाधव, शिलाई मशिन चालक