पनवेल,शैलेश सणस –कोविड 19या माहमारी मुळे लॉकडावुन मधे पनवेल-विचुंबे येथे राहत असलेल्या 19जणांच्या कामगार कुटुंबीयांना अन्न-धान्य आणी रोख आर्थिक मदत नुकतीच श्री शिवगीरी सेवा सस्थंनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.हे सर्व जण रत्नागिरी जिल्ह्यातील रहीवाशी आहेत.पण सध्या कंपन्या बन्द आणी वाहतूक व्यवस्था बंद झाली आहे.त्या मुळे ह्या 19जणांची फारच अडचण जाहली होती.ही बाब रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवगीरी सस्थंचे साधक श्री. मिलिंद सुर्वे यांना समजली.त्यांनी स्वतः ही बाब श्री शिवगीरी सस्थांन्चे संस्थापक-अध्यक्ष श्री दीलीप खोत यांना सांगितली. त्यानूसार श्री दीलीप खोत यांचे शुभ हस्ते अन्नधान्य आणी आर्थिक मदत मन्डळचया वतीने केली. सदर मदत ही कामगार बंधू च्या वतीने निलेश पताड़े यानी स्विकारली आणी या मदती बाबत आभार मानले.
श्री शिवगीरी सेवा सस्थंन यांनी वेळोवेळी अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान,वह्या वाटप,पॉवर लिफ्टीँग स्पर्धा,शरीरसौस्ठव स्पर्धा ,गोशाळा मदत आदी उपकर्म पार पाडली आहेत.तसेच ठाणे,पनवेल ,रत्नागिरी येथे श्री गणेश याग,दत्तयाग,देवी याग सारखे धार्मिक कार्यक्रम केले आहेत. या सस्थांन्चे वैशिष्ट्य महणजे प्रत्येक साधक आपली जबाबदारी पार पाडत आहेत.धार्मिक विधी शिवानंद प्रभू,प्रसाद खोत,मिलिंद पांचाळ,संदीप जाधव,बाळा तोड़वळकर,तर आर्थिक व्यवहार कु.प्रतीभा धामापुर कर(वकील),श्री धामापुरकर काका,श्री गिरीष गव्हाणे,राजु खोत आदी सभल्तत आहेत.क्रीडा विभाग श्री अरुण लक्ष्मण पाटकर (रायगड जिल्हा पॉवर लिफ्फ्टीँग,सचिव),उदय सावंत राहळ गजरमल आदी कार्यकर्ते सभाळत.आहेत.विशेष म्हणजे या मन्डळीना आखिल विश्व साधू सघटणा अद्यक्ष 1008 श्री शांतीगीरी महाराज(गुजरात) यांचे प्रोत्साहन मिळते. महाराष्ट्रातील महान विभूती दिवंगत श्री गगन महाराज हे खोत दादा आणी शांती गीरी महाराज यांचे गुरुबंधु होते.
बीडमध्ये आणखी दोन पॉझिटीव्ह; आकडा ४१