वडवणी, प्रतिनिधी – संचारबंदी काळात गरजूंना व ज्यांचे हातावर पोट आहे असे समाज घटक यांना मदत व्हावी , दिलासा मिळावा याच विधायक भूमिकेतून लढा दुष्काळाच्या वतीने अॅड राज पाटील यांनी वडवणी तालूक्यात चिंचाळा देवडी, राजाहारीचंद्र पिंपरी ,चिंचोटी ,पुसरा, हिवरगव्हाण आदि ठिकाणी ५०० गरजू कुटुंबांना किराणा सामान व मास्क मॅनाट्राईज साहीत्याचे वाटप करण्यात आले आहे.
वडवणी तालुक्यातील तिगावचे माजी सरपंच तथा लढा दुष्काळाचे प्रमुख अँड राज पाटील व त्यांचे सर्व टिमच्या वतीने वडवणी तालूक्यातील प्रत्येक गावातील गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले . यावेळी गरजूंना गहू , साखर , तुरदाळ , रवा , चहापत्ती आणि अंगाचे साबण या जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा साहित्य व सॅनाट्राईजर मास्क कीट्सचे वाटप करण्यात आले आहे . अँड राज पाटील हे सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेतात . ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात . तिगावचे सरपंच असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासतात केलेली विविध विकासकामे वडवणी तालूका अद्यापही विसरलेले नाहीत . कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून अॅड राज पाटील यांनी नव्या पिढी समोर चांगला आदर्श ठेवला आहे . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या ‘ लॉकडाऊन ‘ मुळे हातावर पोट असलेल्या मजरी , रोजंदारी करणा – या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे . अशा कुटुंबांना लढा दुष्काळाची टिम व अँड राज पाटील कुटुंबियांनी मदतीचा हात दिला आहे . लढ दुष्काळाच्या माध्यमातुन यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे . वडवणी तालूक्यात हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या ज्यात नाभिक , सफाई कामगार , बारा बलुतेदार समाज बांधव , अनुसूचित जाती व जमाती समाज बांधव , घरकाम करणा या महिला भगिनी व गरजूंना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप ‘ सोशल डिस्टन्स ‘ पाळून , मास्क बांधून व रितसर यादी तयार करून घरपोहोच करण्यात आले आहे . यावेळी प्रा सत्येप्रेम मगर ,सर माजी सरपंच आशोक निपटे, आरुण मोरे, पत्रकार रामेश्वर गोंडे संपुर्ण तढा दुष्काळाची टिम यांचे सहकार्य लाभले.