वनामकृविचा लाखोंचा ’चंदा’गेला कुणाकडे ?- भाग 1

पुणे, प्रतिनिधी – परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे नेहमीच आपल्या गैर कारभारामुळे चर्चेचा विषय असते. सध्या विद्यापीठात सातव्या वेतन आयोगासाठी सर्वच कर्मचार्‍यांकडून विद्यापीठातीलच काही कर्मचार्‍यांनी प्रति कर्मचारी (कर्मचार्‍यांच्या पद व वर्गानुसार?) ठराविक रक्कमेचा चंदा गोळा करून मुंबईला पाठविल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्‍न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. यामागे काय कारणे आहेत हे माहिती नाही. परंतु सातवा वेतन आयोगाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील काही कर्मचार्‍यांनी पुढाकार घेत विद्यापीठातील अधिकारी / कर्मचार्‍यांकडून ’चंदा’ (निधी) गोळा असे विद्यापीठातील कर्मचारीच सांंगत आहेत. आमच्या प्रतिनिधींनी विद्यापीठातील अनेक कर्मचार्‍यांशी संवाद साधला असता प्रत्येकाच्या पदाच्या श्रेणीनुसार ही रक्कम (’चंदा’) वेगवेगळी असल्याचे सांगितले. तसेच या वसुलीबाबत जुलै 2019 मध्ये एका अधिकार्‍याच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढून त्यात पैसे कोणाकडे द्यायचे याची नावांसहीत यादी देण्यात आल्याचे समजते. या परिपत्रकाच्या सत्यतेबाबतही खात्री करणे गरजेचे आहे. आम्ही विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयातील  टेलिफोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असल्याचे कळते. परंतु विद्यापीठातील शिक्षक कर्मचार्‍यांना अद्यापही सातवा वेतन लागू झालेला नाही. यामागे काय गौडबंगाल आहे ? काय ’चंदा’ कमी पडला की काय? का शिक्षकांकडे मागील वसुलीमुळे अडचण येत आहे ? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

 

विद्यापीठात दबक्या आवाजात ’चंदा’ गोळा केल्याची चर्चा होत असली तरी याला कायदेशीर पुरावा नाही. परंतु हे खरे आहे. ’चंदा’ कोणी गोळा केला ?, कोणी कोणी किती किती दिला? व कोणापर्यंत पोहोचवला या चर्चेने मात्र उधाण आले आहे. चौकशी केल्यास अधिक सत्य बाहेर येवू शकते.सध्या राज्यात विविध मंत्र्यावर आरोप होत असताना आता कृषि विद्यापीठाचे चंदाप्रकरण देखील चव्हाट्यावर येत असल्याने मोठा गोंधळ माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शब्दराजचे प्रतिनिधी ’त्या’ पत्राची शहानिशा करण्याचे काम करत असून त्यानंतर अधिक सविस्तर वृत्त देण्यात येईल.

7th pay commission funds collection in vnmkvचंदावनामकृवि
Comments (0)
Add Comment