वैजापूर, विलास म्हस्के – शहरासह तालुक्यात मंगळवार दि ९ रोजी चार पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे शहरासह तालुक्यात मोठा दिलासा मिळाला होता. परंतु शुक्रवार दि १२ रोजी सकाळी शहरातील लाडगांव रोडवरील मुस्तफा पार्क येथील ६२ वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
या रुग्णांस औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, त्यांना चार पाच दिवसापासून त्रास होत आल्यामुळे शहरातील दोन खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता. परंतु अराम न पडल्याने गुरुवार दि ११ रोजी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल करून स्वब नमुना तपासणीसाठी घेतला व आज उघडकीस आला या रुग्णांच्या संपर्कातील ७ ते ८ व्यक्तींना तपासणीसाठी वैजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ संदीपान सानप, तहसिलदार निखिल धुळधर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन टारपे, तलाठी जितेंद्र चापाणेरकर, निर्भय संस्थेचे बाबासाहेब वाघ, मजिद कुरेशी, वाहेद खान, नगर पालिका कर्मचारी बाबूराव पूणे, प्रमोद निकाळे, जगन ननावरे व कर्मचारी यांना माहिती मिळताच घटनास्थली भेट देऊन हा परिसर सिल करण्यात आला.
सदरील रुग्ण कोणच्या संपर्कात आला याची चौकशी चालू आहे.
– तहसीलदार निखिल धुळधर