शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी जमीन नुसार योग्य वाणाची निवड करा-तालुका कृषी अधिकारी देशमुख

पालम, प्रतिनिधी – शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी जमीन नुसार योग्य वाणाची निवड करावी असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी दि 8 रोजी सोमेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या पेरणीपूर्व शेतीशाळा कार्यक्रमा प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी अभय हनवते. चव्हाण.गलांडे . वणवे. आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की पेरणीपूर्व शेतीशाळेमध्ये बियाणे खरेदी करताना घरचे बियाणे वापर करणार असाल तर त्याची उगवण क्षमता चाचणी कशी घ्यावी, शाश्वत उत्पादन मिळ्वण्यासाठी जमिनी नुसार योग्य वाणाची निवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, पिकाच्या पाण्याची गरजेनुसार जलव्यवस्थापन व योग्य वेळेला काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान या पंचसूत्राची सविस्तर माहिती देत बीजप्रक्रिया का करायची, निंबोळी अर्काचे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये असणारे महत्व मातीचे नमुने शास्त्रीय पद्धतीने कसे काढायचे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ही करून दाखवण्यात आले. यावेळी कृ.प. श्री. हनवते, व कृ.स. श्री. लोखंडे आदी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने मोलाचे मार्गदर्शन केले. सोमेश्वर गावचे सरपंच राम कदम यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशी करा सोयाबीन पिकाची लागवड

संत तुकाराम महाराज यांचे प्रस्थान सोहळा मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थित संपन्न



Comments (0)
Add Comment