शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यस्थीने दीडशे टन युरिया खताचे वाटप

माजलगांव,प्रतिनिधी:-  तालुक्यात यंदा पेरण्या वेळेवर झाल्या असून आता पिकांना कृत्रिम खतांची गरज भासत आहे.परंतु कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांना कृत्रिम रीतीने युरिया खताची टंचाई दाखवून , चढत्या भावाने युरिया विक्री करण्याचे काम करत आहेत , ही बाब शेतकरी कामगार पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड.नारायण गोले पाटील यांनी कृषी अधिकारी संगेकर व हजारे यांच्याकडे कृषी सेवा केंद्राची तक्रार करून व कृषी सेवा केंद्राच्या संचालकांना समज देऊन तालुक्यातीलअनेक उपेक्षित शेतकऱ्यांना दीडशे टन युरिया खताचे वाटप करण्यास भाग पाडले .

कोरणा रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन असल्याच्या कारणावरून काही कृषी सेवा केंद्र युरिया खताची कृत्रिम टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री करत होते व या खतासोबत इतर खत घेण्याची त्यामुळे सक्ती करत होते , शेतकऱ्यांना इतर खतांची आवश्यकता नसताना देखील नाईलाजास्तव इतर खत खरेदी करावा लागत असे त्यामुळे शेतकऱ्यांची विनाकारण पिळवणूक होत असे.

ही बाब शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाईअॅड . नारायण गोले पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी , जिल्हा कृषी अधिकारी , विभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून शेतकऱ्याची लुट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कार्यवाही करण्यास भाग पाडले असल्याने कृषी सेवा केंद्रा कडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक वेळीच थांबली व उपेक्षित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले त्यामुळे सामान्य शेतकरी समाधानी झाला असून पिकांना वेळेवर खत देणे शक्य झाले आहे . याबाबत तालुक्यातील सामान्य शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड.नारायण गोले पाटील यांचे आभार मानत आहे .

परभणी जिल्ह्यातील पहिलाच आमदार कोरोना पॉझिटिव, स्वतः आमदारांनी फेसबुक पेज वरून केले जाहीर

beedबीडमाजलगांव
Comments (1)
Add Comment