शेतकरी, टायरगाडीवान व ऊसतोड मंजूरांच्या मागण्या मान्य करा.-भाई सोळंके

माजलगांव,प्रतिनिधी : – लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने गाळप हंगाम २०१९-२०मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उस गाळपास नेला परंतु त्या उसबिलाची रक्कम आतापर्यंत दिलेली नाही.साखर आयुक्तांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे तर ऊस उत्पादक शेतकरी, टायरगाडीवान व ऊसतोड मजुरांचे देयके सदर कारखान्याकडे अनेक मागण्या प्रलंबित असुन त्या मागण्या मार्गी लावाव्यात अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई लक्ष्मण सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी यांचेकडे ९जुलै रोजीच्या निवेदनात करण्यात येऊन
प्रकरणात नमूद करण्यात आले आहे.

कारखान्याकडून गाळप हंगाम २०१५ ते आजपर्यंत टायरगाडीच्या बैलांचा व ऊसतोड मजुरांचा प्रतिवर्षी विमा किती भरल्या जातो, त्यांच्याकडून किती वसुल केला जातो तसेच दुर्दैवी घटना घडल्या त्यांच्या किती कुटुंबीयांना लाभ देण्यात आला. याची माहिती पावत्यांसह लेखी स्वरूपात देण्यात यावी.विधानसभा मतदारसंघात तीन साखर कारखाने आहेत. लोकनेते सुंदरराव सोळंके सह. साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना, जय महेश शुगर्स परंतु या तिन्ही कारखान्यावर ऊसाचा दर बदलला जातो.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असुन तीन्ही साखर कारखान्यांनी समान भाव द्यावा, तीन्ही कारखाने वेगवेगळ्या रिकव्हरी देत रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांच्या ऊसाला कमी भाव देतात त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने जे कारखानदार रिक्व्हरी चोरतात त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. १९जुलै पर्यंत निवेदनावर कारवाई न केल्यास झाल्यास २०जुलै पासुन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशाराही भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई लक्ष्मण सोळंके यांनी दिला आहे.

परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

beedमाजलगांव
Comments (0)
Add Comment