कोपरगाव, मधुकर वक्ते – कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी, डाऊच, कोकमठाण या ग्रामीण भागातील विजपुरवठा खंडीत न करता नियमीत करावा अशी शेतकरी वर्गाने मागणी केली आहे.
सध्या अनेक शेतकऱ्यांची पिके शेवटच्या पाण्यावर आहे . अशा परिस्थतीत विज खंडीत केल्यास शेतकऱ्यांचे उभे पिक पाणी न मिळाल्याने हातातुन जाणार आहे तसेच मागील आठवडयात महावितरण कंपनीने या भागातील रोहित्र शेतकऱ्यांनी कंपनीने सांगीतलेल रक्कम भरली तरीही बंद केले होते. त्यानं तर आजही शेतकऱ्यांना शेतपंपासाठी नियमीत विज मिळत नाही त्यामुळेआज कोपरगाव पॉवर हाऊस जवळ जेऊर कुंभारी, डाऊच गावातील शेतकऱ्यांनी या वेळेस विज खंडीत होण्याचे कारण विचारले परंतु संबंधीतअधीकारी यांना समाधान कारक उत्तर देता आले नाही.
त्यामुळे विजपुरवठा सुरळीत केला नाही तर तिव्र आंदोलन छ्डण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या वेळी सहकार महर्षे शंकराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब वक्ते, सभापती शिवजीराव वक्ते, माजी सरपंच रमेश वक्ते,डाऊच गावातील सरपंच संजय गुरसळ, मधुकर वक्ते, सतिष आव्हाड, विठ्ठलराव आव्हाड, जालिंदर चव्हाण, लक्ष्मण वक्ते, शिवजी यादव वक्ते, ऐसम वक्ते, आनंदा चव्हाण, सोपानराव वक्ते, कोंडीराम वक्ते, साहेबराव वक्ते, धोंडीराम वक्ते, बापुराव वक्ते, अशोक राऊत, संजु चव्हाण, भिकाभाऊ चव्हाण, दादासाहेब चव्हाण, आदीसह जेऊर कुंभारी व डाऊच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.